मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करत अफगाणिस्तानने कमाल केली होती. मात्र तशीच कामगिरी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात करता आली नाही. उलट 149 धावांनी पराभव झाल्याने न्यूझीलंडला जबरदस्त फायदा झाला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र अपेक्षित कामगिरी करण्यात अफगाणिस्तानला अपयश आलं. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 50 षटकात 6 गडी गमवून 288 धावा केल्या आणि विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानचा संघ 34.4 षटकात सर्वबाद 139 धावा करू शकला. अफगाणिस्तानचा 149 धावा आणि 15.2 षटकं राखून पराभव केला.
न्यूझीलंडने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यात अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने फायदा झाला आहे. गुणतालिकेत 8 गुण आणि +1.923 नेट रनरेटसह अव्वल स्थान गाठलं आहे. तर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेत 4 सामने खेळले असून तीन सामन्यात अपयशाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे थेट नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 ऑक्टोबरला सामना होणार आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशचा मोठ्या फरकाने पराभव केला तर नक्कीच अव्वल स्थान गाठण्यास मदत होणार आहे. चौथ्या टप्प्यात उपांत्य फेरीच्या दृष्टीने बरंच चित्र स्पष्ट होणार आहे. तळाशी असलेल्या संघांना उपांत्य फेरीसाठी सर्वच सामने जिंकावे लागणार आहे. म्हणजेच करो या मरोची लढाई येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.