Video : Rachin Ravindra मानलं रे पठ्ठ्या, इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचा केला टप्प्यात कार्यक्रम!

| Updated on: Oct 05, 2023 | 9:11 PM

Rachin Ravindra : न्यूझीलंड संघाचा 23 वर्षाचा खेळाडू इंग्लंडसाठी कर्दनकाळ ठरला. गड्याने बॅट आणि बॉलिंगनेही आपलं काम केलं आहे. रविंद्र संयम पाहायचा असेल तर त्याने घेतलेल्या या विकेटचा व्हिडीओ एकदा पाहाच.

Video : Rachin Ravindra मानलं रे पठ्ठ्या, इंग्लंडच्या या खेळाडूचा केला टप्प्यात कार्यक्रम!
Follow us on

मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात झाली असून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या सामन्यात किवींनी 9 विकेट्सने हा सामना जिंकला. दोन्ही तगड्या टीम होत्या मात्र न्यूझीलंड संघाने एकतर्फी विजय मिळवला असून मागील वर्ल्ड कप झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या शतकी खेळींच्या जोरावर त्यांनी हा सामना खिशात घातला. या सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मॅचविनर ठरलेल्या रचिन रवींद्र याने एका खेळाडूला ठरवून आऊट केलं.

रचिन रवींद्र याला पहिल्याच ओव्हरमध्ये दोन चौकार आणि एक षटकार मारला. इंग्लंडच्या तीन विकेट्स गेल्या असताना हॅरी ब्रूक आक्रमण करत होता. पण हार मानेल तो रचिन कसला, तो घाबरला नाही त्याने परत ब्रूकला तसाच चेंडू टाकला. यावेळी चौकार-षटकार नाहीतर ब्रूकच जाळ्यात सापडला होता.

पाहा व्हिडीओ-

 

अवघ्या 23 वर्षाच रचिन पहिल्या ओव्हरमध्ये सिक्सर-चौकार बसल्याने घाबरल नाही. गडी आपल्या लाईन लेंथवर कायम राहिला आण त्याने हॅरी ब्रूक याला तंबूचा रस्ता दाखवला. इतकंच नाहीतर तर रचिन याने बॅटींगला आल्यावर आक्रमक शतकी खेळी करत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. रचिन याने 96 चेंडूत 123 धावा केल्या यामध्ये 11 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यासोबतच डेव्हॉन कानवे यानेही अवघ्या 121 मध्ये 152 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 19 चौकार 5 षटकार मारले. दोघांच्या भागीदाराने संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 282 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना 36.2 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने हे आव्हान पूर्ण केलं. मागील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला किवींना व्याजासकट वसूल केलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही.