मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील सेमी फायनलमध्ये चार संघ एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना परत एकदा न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या सामन्याआधी आजी-माजी खेळाडूने अनेक भविष्यवाणी केल्या होत्य. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी खेळाडू रिकी पॉन्टिंगने एक सल्ला दिला आहे.
रिकी पान्टिंग याने सेमी फायनमधील सामन्यामध्ये संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करत एका खेळाडू बाहेर ठेवत एका खेळाडूला संघात स्थान द्यावं असं पॉन्टिंगने म्हटलं आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू ज्याला पॉन्टिंगने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात त्याला संधी द्यावं असं पॉन्टिंग म्हणत आहे.
या स्पर्धेतील आकडेवारी पाहिली तर लाबुशेन याने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय मधल्या फळीचे उदाहरण देताना पाँटिंग म्हणाला, लाबुशेन भारताप्रमाणे मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला मजबूत करू शकतो. स्टॉइनिसच्या जागी संघात त्याला जागी देण्यात यावी, असं रिकी पॉन्टिंग याने म्हटलं आहे. वर्ल्ड कपमध्ये स्टॉइनिसने सहा सामन्यांमध्ये 21.75 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत, तर 35.75 च्या सरासरीने चार विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, स्टॉइनिसच्या जागी लाबुशेन मधल्या खेळामध्ये असेल तर बॅटींग आणखी मजबूत होईल. लाबूशेन मधल्या खेळीमध्ये संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे आता कर्णधार पॅट कमिन्स दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात कोणाला संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण स्टॉइनिस बॉलिंगलमध्येही आपली कमाल दाखवून देऊ शकतो. आता 16 नोव्हेंबरला ईडन गार्डनमध्ये दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा आणि मिचेल स्टार्क.