IND vs PAK : पाकिस्तानच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला सुनावलं, त्या ट्वीटवर दिलं असं प्रत्युत्तर

| Updated on: Oct 14, 2023 | 11:34 PM

World Cup 2023, IND vs PAK : भारताने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. वनडे वर्ल्डकप इतिहासातील भारताचा हा सलग आठवा विजय आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु असलेलं वादळ शांत झालं आहे.

IND vs PAK : पाकिस्तानच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला सुनावलं, त्या ट्वीटवर दिलं असं प्रत्युत्तर
IND vs PAK : संयमी सचिन तेंडुलकरने केली शोएब अख्तरची बोलती बंद, त्या ट्वीटला दिलं जबरदस्त उत्तर
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. सलग तीन सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे भारताची उपांत्य फेरीकडे वाटचाल सोपी झाली आहे. भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं. भारताने आठव्यांदा पाकिस्तानला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभूत केलं आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ आणि आजी माजी खेळाडूंकडून विजयाचा दावा करण्यात आला होता. इतकंच काय तर भारताला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही वारंवार भारताला डिवचण्यासाठी सोशल मीडियावर रान उठवलं होतं. आता त्याच्या 24 तासापूर्वीच्या ट्वीटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने उत्तर दिलं आहे. अख्तरने त्या ट्वीटमध्ये सचिन तेंडुलकर याचा फोटो वापरला होता. त्या फोटोत शोएब अख्तर सचिन तेंडुलकरला आऊट केल्याचा आनंद साजरा करत होता.

काय म्हणाला होता शोएब अख्तर?

शोएब अख्तर याने शेअर केलेला फोटो एशियन टेस्ट चॅम्पियनशिपचा आहे. यात इडन गार्डनमध्ये शोएब अख्तरने सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतले होते. अख्तरने राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांना बोल्ड केलं होतं. हा सामना पाकिस्तानने 46 धावांनी जिंकला होता. शोएब अख्तर याने हा फोटो ट्वीट करत लिहिलं होतं की, ‘उद्या जर असं काही करायचं असेल तर शांत राहा.’

सचिन तेंडुलकरने दिलं मजेशीर उत्तर

अहमदाबादमध्ये भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पाकिस्तानला 42.5 षटकात सर्वबाद 191 धावांवर रोखलं.वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने 7 गडी राखून विजय मिळवल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत लिहिलं की, “माझ्या मित्राचा सल्ला तुम्ही ऐकला आणि सगळं काही थंड ठेवलं.”

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने 50 आणि मोहम्मद रिझवान याने 49 धावा केल्या. जसप्रीत बुमराहसह पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. टीम इंडियाला 192 धावांच लक्ष्य देण्यात आलं होतं. कर्णधार रोहित शर्माने 86 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल आणि विराट कोहली प्रत्येकी 16 धावा करून बाद झाले. तर केएल राहुल नाबाद 19 धावांवर होता.