SA vs PAK : अटीतटीच्या लढतीत दक्षिण अफ्रिकेने मारली बाजी, पाकिस्तानवर 1 गडी राखून मिळवला विजय

| Updated on: Oct 27, 2023 | 10:44 PM

World Cup 2023, SA vs PAK : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अतितटीच्या लढतीत दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून होती. अखेर दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली आहे. एक गडी राखून दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानला पराभूत केलं.

SA vs PAK : अटीतटीच्या लढतीत दक्षिण अफ्रिकेने मारली बाजी, पाकिस्तानवर 1 गडी राखून मिळवला विजय
SA vs PAK : अतितटीच्या लढतीत दक्षिण अफ्रिकेने मारली बाजी, 1 गडी राखून मिळवला विजय
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 26 वा दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान या संघात झाला. या सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 46.4 षटकात सर्व गडी बाद 270 धावा केल्या आणि विजयसाठी 271 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. पण दक्षिण अफ्रिकेने 1 गडी आणि 16 चेंडू राखून पाकिस्तानला पराभूत केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची वाट आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तानची घसरण सहाव्या स्थानावर झाली आहे. पाकिस्तानचे आणखी तीन सामने बाकी आहेत. पण तीन सामन्यात विजय मिळवूनही जर तरची लढाई असणार आहे.

पाकिस्तानचा डाव

पाकिस्तानची सुरुवात हवी तशी झाली नाही. अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक स्वस्तात बाद झाले. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला. बाबर आझम याने 65 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानंतर सउद शकील आणि शादाब खान या शेपटच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. सउद शकील याने 52 चेंडूत 52 धावा, शादाब खान याने 36 चेंडूत 43 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेज शम्सीने 4, मार्को जानसेन 3, जेराल्ड कोएत्झी याने 2 , लुंगी एनगिडी याने 1 गडी बाद केला.

दक्षिण अफ्रिकेचा डाव

दक्षिण आफ्रिकेला धावांचा पाठलाग करताना पहिला धक्का 34 धावांवर बसला. क्विंटन डीकॉक हा 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर टेम्बा बावुमा 28 धावा करून तंबूत परतला. रस्सी व्हॅनदर डुसेन हा देखील काही खास करू शकला नाही. 21 धावा करून बाद झाला. एकीकडे पडझढ होत असताना एडन मार्करम याने 93 चेंडूत 91 धावा केल्या. या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार मारले. क्लासेन काही चांगलं करेल असं वाटत होतं पण 12 धावांवर आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर एकही फलंदाज

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ