मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 23 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात रंगला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 5 गडी गमवून 382 धावा केल्या. विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना बांगलादेशचा डाव गडगडला. बांगलादेशला षटकात 233 धावा करता आल्या. महमुदुल्लाह सोडता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. तर क्विंटन डीकॉक याने स्पर्धेतील तिसरं शतक ठोकलं आहे. दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये फायदा झाला. यामुळे गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
दक्षिण अफ्रिकेच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. संघाच्या 36 धावा असताना रीझा हेन्ड्रिक आणि रस्सी वॅन देर डुसेने स्वस्तात बाद झाले. त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि एडन मार्करम यांनी डाव सारवला. त्यानंतर हेन्रिक क्लासेन याने जबरदस्त खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. क्विंटन डीकॉक याने 140 चेंडूत 174 धावा केल्या. यात 15 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. तसेच मार्करमने 69 चेंडूत 60 धावा आणि हेन्रिक क्लासेननं 49 चेंडूत 90 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमुदने 2, मेहदी हसन 1, शोरीफुल इस्लाम 1 आणि शाकिब अल हसनने 1 गडी बाद केला.
दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघाची घसरण सुरु झाली. महमुदुल्ला हा एक फलंदाज सोडला तर दुसरं कोणीही चांगली कामगिरी करू शकला नाही. दक्षिण अफ्रिकेकडून मार्को जानसेननं 2, गेराल्ड कोएत्झी याने 3, लिजाद विल्यिम्स 2, कागिसो रबाडा 2 आणि केशव महाराज याने 1 गडी बाद केला.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.