World Cup 2023 : ‘विराट कोहलीबाबत कधीच ‘ही’ चूक करू नका’; माजी खेळाडूचा जगातील सर्व बॉलर्सला कानमंत्र!

| Updated on: Aug 30, 2023 | 7:47 PM

ODI World Cup 2023 : गेल्यावेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर विरोधक ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये एकमेकांसोबत भिडले होते. या सामन्यात कोहलीने 'विराट' विजय मिळवून दिलेला.

World Cup 2023 :  विराट कोहलीबाबत कधीच ही चूक करू नका; माजी खेळाडूचा जगातील सर्व बॉलर्सला कानमंत्र!
Follow us on

मुंबई : आजपासून आशिया कप 2023 च्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यापासून आशिया कपचा थरार सुरु झाला आहे. या सामन्यात कोण कोणावर भारी पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मात्र अनेकांच्या नजरा 2 सप्टेंबरला होणाऱ्या आशिया कपमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावर टिकून आहेत.

भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी सुरु झालेल्या आशिया कपमध्ये आणि भारतात होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघांनी आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली तर  दोन्ही संघ एकूण 5 वेळा भिडू शकतात. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेासामने असतात तेव्हा विराट कोहली हा हुकमी एक्का आपलं काम करतो. अशातच विराट कोहलीबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडूने विरोधी संघाना एक इशारा दिला आहे. विराटबाबत ती एक चूक करू नय असं त्याचं म्हणणं आहे.

कोण आहे तो खेळाडू :

आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी  याने विराट कोहली बॅटींग करत असताना त्याला बॉलिंग करत असलेल्या प्रत्येक गोलंदाजाला ही एक करु नये असा स्पष्टचं इशारा केला आहे. जर तुम्ही ही चुक केलीत तर कोहली तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही असं एन्टिनीने म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाला मखाया एन्टिनी  :

जेव्हा विराट कोहली फलंदाजी करायला मैदानात येईल तेव्हा त्याला एकही शब्द बोलू नका. मी हे पुन्हा सांगतो की , त्याला  स्लेज करण्याचा प्रयत्न करु नका. जर गोलंदाजांनी असं केलं तर तो त्या गोलंदाजांचा वचपा काढल्याशिवाय राहत नाही. ओळखीच्या गोलंदाजांनी स्लेजिंग केली तरचं त्याला आवडते. नाहीतर तो त्या गोलंदाजाच्या हाथ धुवून मागे लागतो. कोणीतरी त्याला स्लेजिंग करावं हे त्यालासुद्धा खूप आवडत असल्याचं रेव स्पोर्ट्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मखाया एन्टिनीने सांगितलं.

दरम्यान, क्रिकेट वर्तुळात या सामन्याची सर्वत्र चर्चा होतं आहे. गेल्यावेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर विरोधक ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये एकमेकांसोबत भिडले होते. या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर अशक्य वाटतं असलेला विजय विराट कोहलीच्या मॅजिकल खेळीने शक्य करुन दाखवला होता. तो विजय सर्व जगाने पाहिला होता. विराटला किंग कोहली का बोलतात हे त्यानेच आपल्य खेळीने दाखवून दिलं होतं.