मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 20 व्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात आफ्रिकेने 229 धावांनी विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने 399-7 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यामध्ये क्लासेन याने 109 धावांची केलेली वादळी खेळी आणि मार्को यान्सेस याची आक्रमक 75 धावांच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने परत एकदा 400 पर्यंत मजल मारली. इंग्लंडला दिलेल्या लक्ष्यासह दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही दक्षिण आफ्रिकेच्या नावावर असून आजच्या 399 धावांनीसुद्धा मोठा विक्रम रचला आहे. वर्ल्ड कपमधील हा सहावा सर्वाधिक स्कोर ठरला आहे. या यादीमध्ये यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरूद्ध दक्षिण आफ्रिक संघाने 428-5 धावा केल्या होत्या.
वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिका संघ पहिला संघ ठरला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर होता. पाकिस्तान संघाने 2019 साली 348-8 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया असून 2015साली 342-9 धावा केल्या होत्या. तर भारत तिसऱ्या नंबरला असून भारतीय संघाने 2011 साली 338 धावा केल्या होत्या.
दरम्यान, या सामन्यामध्ये आफ्रिकेच्या 400 धावांच्या लक्ष्याच पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 170 धावांवर आटोपला. आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्यासोबतच मार्को यानसेन आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड संघाचा तिसरा पराभव आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.