मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं जेतेपद कोण पटकावणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. दहा संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाले असून वेस्ट इंडिज संघ पात्र होण्यास अपयशी ठरला आहे. आतापर्यंत वेस्ट इंडिजने दोन वेळा, भारताने दोन वेळा, ऑस्ट्रेलियाने 4 वेळा, पाकिस्तान एकदा, श्रीलंका एकदा आणि इंग्लंडने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. यंदा भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 13 व्या पर्वात कोण बाजी मारणार? माजी क्रिकेटपटून इरफान पठाण आणि सुनील गावस्कर यांनी जेतेपदाबाबत आपल्या संघांचं नाव जाहीर केलं आहे.
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्टवर बोलताना सांगितलं की, यंदाच्या जेतेपदासाठी इंग्लंड प्रमुख दावेदार आहे. इंग्लंड संघाकडे चांगली क्षमता आहे. खेळाडूंची क्षमता पाहता इंग्लंड संघ वरचढ ठरेल. त्यांची टॉप ऑर्डर, मधली फळी आणि तीन वर्ल्डक्लास ऑलराउंडर यामुळे सामना जिंकण्याची क्षमता अधिक आहे. त्याचबरोबर गोलंदाजीच्या ताफ्यात अनुभवी गोलंदाज आहेत.
इरफान पठाण यानेही याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. “भारतीय संघ कसा प्रदर्शन करतो याबाबत मी उत्सुक आहे. माझ्या मते जेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे. भारताने मागच्या काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे.त्यामुळे टीम इंडिया योग्य ट्रॅकवर आहे. मोहम्मद शमी एक जबरदस्त गोलंदाज आहे. पण त्याला संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. यावरून भारतात किती चांगले खेळाडू आहेत हे दिसतं. ”
टीम इंडिया: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शर्मी बुमराह , मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.