मुंबई | आयसीसीने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल. या वर्ल्ड कपमधील पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकूण 10 संघ एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. रॉबिन राउंड पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीनंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता शहरात पहिली आणि दुसरी सेमी फायनल मॅच खेळवण्यात येणार आहे. तर 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची अंतिम सामन्याने सांगता होईल.
टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला श्रीगणेशा करणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडिया 2 संघांविरुद्ध खेळणार आहे. या 2 सामन्यांसाठी वेळापत्रक जाहीर झालं आहे. वर्ल्ड कप सामन्यांचं आयोजन हे भारतातील एकूण 13 शहरांमध्ये करण्यात आलंय. मात्र 10 शहरांमध्ये साखळी आणि अन्य सामने खेळवण्यात येतील.
तर उर्वरित 3 शहरात सराव सामने खेळवण्यात येतील. तिरुवनंतरपूरम, गुवाहाटी आणि हैदराबादमध्ये सराव सामने खेळवण्यात येणार आहे.
स्टार स्पोर्ट्सनुसार, टीम इंडिया एकूण 2 सराव सामने खेळणार आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि क्वालिफायर 1 संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
या वर्ल्ड कपमधील 10 पैकी 8 संघ ठरले आहेत. तर उर्वरित 2 संघ हे आयसीसी क्वालिफायरमधून पात्र ठरणार आहेत. या 2 जागांसाठी 10 संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहेत. यातून जिंकणाऱ्या पहिल्या संघाविरुद्ध टीम इंडिया सराव सामना खेळणार आहे.
पहिला सामना, 30 सप्टेंबर, गुवाहाटी, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड.
दुसरा सामना, 3 ऑक्टोबर, तिरुवनंतरपूरम, टीम इंडिया विरुद्ध क्वालिफायर 1.
दरम्यान बीसीसीआयकडून अद्याप सराव सामन्यांबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
?? Team India's fixtures for ICC Men's Cricket World Cup 2023 ??
#CWC23 #TeamIndia pic.twitter.com/LIPUVnJEeu
— BCCI (@BCCI) June 27, 2023
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई.
टीम इंडिया विरुद्ध अफगानिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश – 19 ऑक्टोबर, पुणे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाळा.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 2 नोव्हेंबर, मुंबई.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 5 नोव्हेंबर, कोलकाता.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 11 नोव्हेंबर, बंगळुरु.