मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला अवघे काही दिवस बाकी राहिले असून सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा प्रत्येक संघातील खेळाडूंच्या मागे दुखापतींच ग्रहण लागलंय. वर्ल्ड कपसाठी सर्व संघांनी आपल्या स्टार प्लेअरला आराम देत वर्ल्ड कपसाठी त्याला तयार ठेवलं आहे. वर्ल्ड कप आधी आजी माजी खेळाडू भविष्यवाणी करत आहेत, अशातच व्हिव्ह रिचर्ड्सने यानेही एक दावा केला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणता गोलंदाज सर्वाधिक विकेट घेणार याबाबत एका खेळाडूचं नाव घेतलं आहे.
आगामी वर्ल्ड कपचं भारतामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. देशातील नामांकित मैदानावर वर्ल्ड कपचा थरार रंगणार असून धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या घरच्या मैदानावर सामने होणार असल्याने विरोधी संघांना त्यांना पराभूत करणं अवघड जाणार आहे. अशातच वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्सने या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
व्हिव्ह रिचर्ड्सने ज्या खेळाडूचं नाव घेतलं आहे तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नाहीतर पाकिस्तान संघाचा आहे. शाहिनशाह आफ्रिदी या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणार असल्याचं व्हिव्ह रिचर्ड्सने म्हटलं आहे.
शाहिनशाह आफ्रिदी या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असणार आहे. मी त्याला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना पाहिलं असून त्याच्यासोबत वेळही घालवला आहे. त्याच्याकडे भरपूर आत्मविश्वास असल्याचं व्हिव्ह रिचर्ड्सने यांनी म्हटलं आहे. मंगळवारी आयसीसीने व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये तो बोलत होता.
दरम्यान, आशिया कपमध्ये भारत-पाक हायव्हो्ल्टेज सामना होणार आहे. या सामन्याची क्रीडा वर्तुळात सर्व चाहते वाट पाहत आहेत. आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाक या दोन संघांमध्ये होणार असल्याचा अंदाज अनेक माजी क्रिकेटपटूंनी वर्तवला आहे.
बाबर आझम (C), शादाब खान, मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, फखर जमान, अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, सौद शकील, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रौफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद हारिस (W), फहीम अश्रफ, मोहम्मद वसीम.