मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप 2023 येत्या 5 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. यंदाचं यजमानपद भारताकडे असल्यामुळे भारतीय संघाकडे असल्यामुळे टीम इंडियाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेसाठी आता सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले असून आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबर पासून सराव सामन्यांना सुरुवात झालेली आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्व क्रिकेट जगत भारत-पाक हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसने भारत पाकिस्तान दोन्ही टीम बाबत बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांची तुलना करताना पाकिस्तान संघाला वकार युनूसने कमजोर म्हटलं आहे. इतकंच नाही तर 14 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार असून या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंवर जास्तीत जास्त दबाव असणार कारण या सामन्यामध्ये भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात गोंगाट करतील त्यामुळे याचा नक्कीच पाकिस्तानच्या संघाच्या खेळाडूंवर परिणाम होईल, असंही युनूस म्हणाला.
भारतीय संघाकडे पाहिलं तर जडेजा आणि कुलदीप यादव सारखे उत्कृष्ट स्पिनर आहेत. त्यासोबतच भारताच्या बेंच स्ट्रेंथ पाहता कोणताही खेळाडू दुखापती झाला तरी त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून दुसरा तोडीस तोड खेळाडू भारताच्या ताफ्यात उपलब्ध आहे. त्यामुळे नक्कीच पाकिस्तान आणि भारतीय संघांमध्ये तुलना केली तर भारतीय संघाचं पारडं जड वाटत असल्याचं वकार युनूसने सांगितला आहे.
आशिया कप मध्ये पाकिस्तानचा घातक गोलंदाज नसीम शहा दुखापतीमुळे बाहेर झाला होता. अशिया कपनंतर तो वर्ल्डकप मधूनही बाहेर पडला, नसीमची दुखपात पाकिस्तान संघाला जिव्हारी लागणारी आहे. कारण पाकिस्तान संघाचा स्ट्राइक गोलंदाज म्हणून नसीमकडे पाहिले जातं. त्यामुळे पाकिस्तानची तोफ असलेल्या नसीम शहा उणीव त्यांना वर्ल्डकपमध्ये भासणार असल्याचं वकार युनूसने म्हटलं आहे.
दरम्यान, वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यावेळी पावसाने हजेरी लावली नाही पाहिजे नाहीतर जगभरातील चाहत्यांचा हिरमोड होईल.