टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये टीम इंडियाच्या शिलेदारांनी पाकचा 6 विकेटने पराभव केला. या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय ठरलाय. टीम इंडिया हा सामना जिंकेल अशी आशाही कोणी केली नसावी. मात्र रोहित अँड कंपनीने पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला. टीम इंडियाचा यॉर्कर किंग असलेल्या जसप्रीत बुमराह याने या सामन्याला पूर्ण कलाटणी दिली. पाकिस्तानची पहिली विकेट आणि 19 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. मात्र जसप्रीत बुमराह याच्यासोबत आणखी एक असा खेळाडू जो पडद्यामागचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला.
पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्याही वेगवान गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय बॅटींग लाईनअपला सुरूंग लावलं. आधीच पावसाने सामना सुरू होण्याआधी आणि नंतर एक ओव्हर झाल्यावर खोडा घातला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी विराट कोहली ४ धावा, अक्षर पटेल २१ धावा, सुर्यकुमार यादव ७ धावा, शिवम दुबे ३ धावा आणि हार्दिक पंड्या ७ धावा तर जडेजा ० धावांवर आऊट झाले. मात्र मैदानावर पंत एकटा उभा होता. रिषभ पंत याने ३१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या, यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता.
भारतीय संघ पूर्ण 20 ओव्हरही खेळू शकला नाही, अवघ्या ११९ धावांवर डाव आटोपला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मात्र अनुभवी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी सावध खेळ केला. मात्र बुमराहने बाबरला फसवलंच. बुमराहच्या दोन ओव्हर झाल्यावर विकेट मिळत नव्हती. बुमराहच्या ओव्हर झाल्यावर हार्दिक पंड्या याने आपल्या स्पेलमध्ये पाकिस्तानला झटके दिले. हार्दिक पंड्या याने फखर झमान आणि शादाब खान यांच्या विकेट घेत संघाला यश मिळवून दिलं. या विकेट दोन असल्या तरी ज्या वेळेला मिळाल्या त्या महत्त्वाच्या होत्या.
दरम्यान, हार्दिक पंड्या याच्या संघात असल्याने संघ बॅलन्स असलेला दिसतो. पंड्याने आजच्या सामन्यातून हे सिद्ध करून दाखवलं. आज पाकिस्तान संघाला पराभूत केलं असलं तरी हार्दि पंड्या आणि रिषभ पंत हे दोन्ही खेळाडू पडद्यामागचे विजयाचे हिरो आहेत. पंतने कीपिंगही चांगली केली.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग