मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. सात पैकी सातही सामने एकहाती जिंकले आहेत. विरोधकांना जिंकण्याची कोणतीच संधी दिली नाही. एकही सामना अटीतटीचा झाला नाही यावरूनच भारताच्या कामगिरीचा अंदाज येतो. टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता साखळी फेरीतील औपचारिक दोन सामने खेळायचे आहेत. उपांत्य फेरी गाठल्याने टीम इंडिया जेतेपदापासून दोन पावलं दूर आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ आणि 12 वर्षानंतर वर्ल्डकपचं स्वप्न पुन्हा साकार करणार आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या याला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण इतर खेळाडूंनी त्याची उणीव भासू दिली नाही. त्यामुळे जेतेपद भारतालाच मिळणार असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा जिथे दिसेल तिथे चाहते जेतेपदाबाबत प्रश्न विचारत आहेत. असाच प्रश्न एका चाहत्याने रोहित शर्मा याला एअरपोर्टवर विचारला.
साखळी फेरीतील आठव्या सामन्यासाठी टीम इंडिया कोलकात्याला रवाना झाली आहे. 5 नोव्हेंबर टीम इंडियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात होणार आहे.त्यानंतर टीम इंडिया 12 नोव्हेंबर नेदरलँडशी सामना करेल.तत्पूर्वी रोहित शर्माला एका चाहत्याने जोरात वर्ल्डकप आपला आहे ना? असा प्रश्न विचारला. तेव्हा त्याने जाता जाता उत्तर दिलं की, “अजून वेळ आहे.”
Sir world Cup Apna hai na?🥹
Rohit Sharma – abhi Time hai🥺🧿 pic.twitter.com/rn4Mo7Lndn
— 🧢ʀᴀᴊɴᴀɴᴅᴀɴɪ ꜱɪɴɢʜ⁴⁵🇮🇳 ( Rohika) (@Singh_Ro45) November 3, 2023
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारताने श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीला भलतीच धार चढल्याचं दिसून येत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीने 5 गडी बाद करत विक्रमही नोंदवला. भारताने 9 पैकी 9 सामने जिंकत टॉपवर राहिला तर चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी लढत होत आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर कोणता संघ येतो, याची उत्सुकता आहे. पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली तर उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.