मुंबई : आयसीसीने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने होणार आहे. या स्पर्धेती अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत टीम इंडिया एकूण 9 सामने खेळणार आहे. या स्पर्धेत गट नसून प्रत्येक संघ एकमेकांसमोर उभा राहणार आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि क्वालिफाय होणाऱ्या दोन संघांसोबत लढत असणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेपूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
रोहित शर्मा सांगितलं की, “घरच्या मैदानावर खेळणं एक वेगळाच अनुभव असतो. भारताने 12 वर्षापूर्वी जिंकला होता. मला माहिती आहे की,फॅन्स मैदानात उतरण्याची वाट पाहात आहे. या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त स्पर्धा असणार आहे. कारण संघ आधी पेक्षा अधिक क्षमतेने खेळत आहेत. टीम इंडिया चांगल्या तयारीसह स्पर्धेत प्रदर्शन करेल.ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चांगली कामगिरी करू.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं आहे.
?️?️ We look forward to preparing well and being at our best this October-November #TeamIndia Captain @ImRo45 is all in readiness ahead of the #CWC23 ?? pic.twitter.com/ZlV8oNGJ04
— BCCI (@BCCI) June 27, 2023
टीम इंडियाने मागच्या दहा वर्षात आयसीसी चषक जिंकलेला नाही. 2013 मध्ये भारताने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारत दोनदा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधये पोहोचला होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत हरवलं होतं. त्यानंत 2019 मध्ये न्यूझीलंडने पराभूत केलं होतं.
दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी 20 वर्ल्डकप आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. याच महिन्यात टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं.
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघ खेळणार आहे. प्रत्येक संघ 9 सामने खेळणार असून गुणांच्या आधारे 4 संघाची उपांत्य फेरीत निवड होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने मुंबईच्या वानखेडे आणि कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये होणार आहे. पहिला सामनना 15 नोव्हेंबर आणि दुसरा सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबर रविवारी होणार आहे.