मुंबई : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात पाऊस पाकिस्तानच्या मदतीला धावून गेला. न्यूझीलंडने प्रथम बॅटींग करताना 401/6 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने दमदार सुरूवात केली होती. 25.3 ओव्हरमध्ये 200-1 धावांवर केल्या मात्र उर्वरित सामन्यामध्ये पावसाने बॅटींग केली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान संघाने हा सामना 21 धावांनी जिंकला. या विजयमामुळे सेमी फायनलचं गणित आणखी किचकट होऊन बसलं आहे. मात्र पाकिस्तान संघ अजूनही सेमी फायनलच्या लढतीमध्ये कायम आहे. पॉईंट टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता पाकिस्तानच्या आजच्या विजयाने किती उलटफेर झाला आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
पाकिस्तान विजयानंतर आता पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र आता ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघांचे आता 8 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यानंतर जास्त नाही जर कांगारू जिंकले तर ते तिसऱ्याच जागी असणार आहेत. मग चौथ्या स्थानासाठी न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होईल. जर ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला तर चार संघांमध्ये दोन जागांसाठी चुरस होताना दिसणार आहे.
दरम्यान, न्यूझीलंडच्या पराभवाने आता भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ सेमी फायनलमध्ये निश्चित झाले आहेत. कांगारू आणि अफगाणिस्तान संघाचे दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना जास्त संधी आहे. पण जर त्यांचा पराभव झाला तर पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान प्लेईंग 11 | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.
पाकिस्तान प्लेईंग 11 | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रॉफ.