मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : न्युझीलंडला सेमी फायनल मध्ये नमवून टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. विराट कोहली , श्रेयस अय्यरच्या विक्रमी खेळीमुळे भारताने धावांचा डोंगर रचला आणि मॅचमध्ये 7 विकेट्स मोहम्मद शमीने न्युझीलंडचा संघ गारद केला. टीमच्या या अभूतपूर्व यशामुळे भारतीय चाहते भलतेच खुश असून आता फायनलमध्येही विजयाचा झेंडा असाच फडकत राहू दे अशीच सर्वा चाहत्यांची प्रार्थना आहे.
या यशात बॅट्समनचा जेवढा मोलाचा सहभाग आहे, तितकाच सिंहाचा वाटा मोहम्मद शमीचाही आहे. या मॅचमध्ये शमीने 7 विकेट काढून भारताला शानदार विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमध्ये त्याने चौथ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. त्याशिवाय आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. सेमीफायनलमधील त्याच्या शानदार कामगिरीमुळे काल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कारही देण्यात आला. या सरस कामगिरीमुळे अख्खं जग त्याला नावाजतयं, सोशल मीडियावर त्याच्या कौतुकाच्या पोस्ट्स पडत आहेत.
मात्र असं असलं तरी एक व्यक्ती अशी आहे, जिने वर्ल्डकपमधील शमीच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखलही घेतलेली नाही. ती व्यक्ती म्हणजे शमीची पत्नी हसीन जहाँ. गेल्या काही काळापासून त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाची बरीच चर्चा झाली. 2018 सालापासून ते दोघे वेगळे रहात आहेत. हसीन जहाँ हिने त्याच्यावर अनेक आरोपही केले. त्यामुळे शमीवर काही काळ टीकाही झाली. अनेक कौटुंबिक समस्या सुरू होत्या.
मात्र त्यातूनही शमी उभारून पुढे आला आणि त्याने संघर्ष करून आज हे यश मिळवले आहे. त्यासाठी अख्खं जग कौतुक करत आहे. पण त्याच्या दुरावलेल्या पत्नीने त्यावर काहीही कमेंट किंवा पोस्ट केलेली नाही. ‘ काहीही असो, ( तो) चांगला परफॉर्म करत आहे. चांगला खेळेल तर तो (शमी) टीममध्ये कायम राहील. चांगली कमाई केली तर आमचं भविष्य सुरक्षित राहील’ अशा आशयाची पोस्ट तिने मध्यंतरी केली होती.
शमी तू इंग्रजी सुधार, मी लग्नाला तयार – सौंदर्यवतीने शमीला घातली मागणी
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एक दुसरी सौंदर्यवती शमीच्या मागे लागली. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेली पायल घोष बरीच चर्चेत आली. तिने क्रिकेटपटू मोहम्मद शमीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यामुळे पायल घोष हे नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं. “ शमी तू तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे” असं तिने X (पूर्वीचं ट्विटर) वर म्हटलं. या मेसेजसोबत तिने दोन हसणारे इमोजीही टाकले होते.