मुंबई : आयपीएल स्पर्धा 2023 संपल्यानंतर भारतीय खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होतील. अंतिम फेरीचा सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर असणार आहे. पण या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र इंग्लंडला जाणार नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया तीन टप्प्यात इंग्लंडला जाणार आहे. पहिली बॅच आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपवल्यावर 23 मे 2023 रोजी निघणार आहे. यामध्ये आयपीएलमध्ये ज्या संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे, असे खेळाडू असतील.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दुसरी बॅच प्लेऑफची 23 मे आमि 24 मे रोजी असणारी प्लेऑफचे सामने संपल्यावर निघेल. अंतिम सामना 30 मे रोजी होणार आहे. त्यानंतर शेवटची बॅच इंग्लंडला रवाना होईल. त्यामुळे कोहली आणि रोहित शर्मा एकत्र जाण्याची शक्यता नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. पॉइंट टेबलचं गणित पाहता दोनपैकी एक टीम प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते. जर दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये एन्ट्री घेतली तर एलिमिनिटेरमध्ये सामना होईल. त्यामुळे एका संघाचा पराभव झाला की विराट किंवा रोहित आधीच इंग्लंडला रवाना होईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर कोणत्याही अडचणीमुळे सामन्यादरम्यान काही षटकांचा खेळ वाया जाऊ नये, याचीही खबरदारी आयसीसीने घेतली आहे. त्या अनुषगांने आयसीसीने 12 जून हा दिवस ठेवला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.