हार्दिक पांड्याने एअरपोर्टवर घातला जगातला सर्वात महागडा ‘दागिना’; किंमत ऐकताच थक्क व्हाल

| Updated on: Jan 09, 2025 | 9:14 PM

क्रिकेटर हार्दिक पांड्या कायमच या न त्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हार्दिक पांड्याने एअरपोर्टवर घातला जगातला सर्वात महागडा दागिना; किंमत ऐकताच थक्क व्हाल
Follow us on

क्रिकेटर हार्दिक पांड्या कायमच या न त्या कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी त्याने आपली पत्नी नताशाला घटस्फोट दिला, यामुळे तो चांगलाच चर्चेत आला. मात्र याही वर्षी हार्दिक पांड्या आपली स्टाईल आणि हटके अंदाजामुळे चर्चेचा विषय बनला आहे.हार्दिक पांड्याने एअरपोर्टवर आपल्या हातात सर्वात महागडं घड्याळ घातलं आहे. नुकताच क्रिकेटर हार्दिक पांड्या एअरपोर्टवर स्पॉट झाला, यावेळी त्याने आपल्या हातामध्ये ‘पॅटेक फिलिप’ ब्रॅण्डचं लग्झरी घड्याळ घातलं होतं. ही घड्याळ पँटेक फिलिप’ ब्रॅण्डचं खास कनेक्शन आहे.

स्पोर्ट्स घड्याळ अशी त्याची ओळख आहे. आजच्या युगात घड्याळ ही केवळ एक एक्ससरीज नाही तर फॅशन स्टेटमेंट बनली आहे. अनेक सेलिब्रेटी आपल्या हातात माहागडे घड्याळ घालतात. मात्र हार्दिकच्या घड्याळाची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 18 कॅरेट सोन्याच्या या घड्याळाच्या किंमतीमध्ये तुम्ही ठरवलं तर एक अलिशान घर देखील खरेदी करू शकता.

ही घड्याळ सामान्य घड्याळासारखीच दिसले, मात्र या घड्याळामध्ये जे फिचर्स आहेत, ते फिचर्स या घड्याळाला इतर घड्याळापेक्षा वेगळे बनवतात.पँटेक फिलिप’हा एक स्वीस लक्झरी घड्याळ ब्रँण्ड आहे.हार्दिक पांड्यानं जी घड्याळ घातली आहे, ती रोज गोल्ड असून 18 कॅरेट सोन्याची घड्याळ आहे. त्याचे गुलाबी सोनेरी रंगाचे पट्टे चांगलेच शोभून दिसतात.

 

इंन्स्टाग्राम चॅनल Indian Horology या चॅनलवर हार्दिक पांड्याने आपल्या हातात घातलेल्या या घड्याळाची किंमत आणि तीचे फिचर्स सांगितले आहेत.Indian Horology नुसार या घड्याळाचा निर्मिती खर्च तब्बल 78,240 डॉलर अर्थात 67 लाख 19 हजार इतका आहे. तर या घड्याळाचं बाजार मूल्य तब्बल 130,000 डॉलर म्हणजेच 1 कोटी 11 लाख 65 हजार रुपये इतकं आहे.

हार्दिक पांड्याच नाही तर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीजला देखील हे घड्याळ पसंत आहे. यामध्ये मेटा कंपनीचे मालक मार्क झुकेरबर्ग,हे देखील हीच घड्याळ आपल्या हातामध्ये घालतात. या घड्यामुळे क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे .