मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीगच्या (WPL 2023) पहिल्या सामन्याला काही तासांचा अवधी राहिला आहे. पहिलच पर्व असलेल्या WPL मध्ये मुंबई आणि गुजरात यांच्याध्ये (Mumbai vs Gujrat) लढत होणार आहे. डॉ. डीवाय पाटील स्टेडिअममध्ये (DY Patil) हा सामना होणार आहे. अशातच सामन्याआधी बीसीसीआयने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याच्यामुळे हा सामना ठरललेल्या वेळेच्या नंतर होणार आहे. सामना रात्री 7 वाजता सुरू होणार होता म्हणजेच सात वाजता नाणेफेक आणि 7.30 वाजता सामन्याला सुरूवात होणार होती.
बदल करण्यात आलेल्या भारतीय वेळेनुसार सामना 8 वाजता सुरू होणार आहे. सामन्याचा टॉस हा 7.30 वाजता होणार आहे. जी वेळ ठरली होती त्यामध्ये का बदल केला जात आहे याची माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. मात्र उद्घाटन सोहळ्यामुळे हा बदल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजता प्रेक्षकांना मैदानात सोडलं गेलं होतं. कारण संध्याकाळी 6.25 वाजता भव्य उद्घाटन सोहळा ते पाहू शकतील. पहिल्या पर्वाचा एक भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लन, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आणि कियारा अडवाणी हे परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत.
मुंबई (Mumbai Indians) आणि गुजरात (Gujarat Giants) यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार असून सामन्यांची तिकीटे ‘बुक माय शो’वरही बुक करता येणार आहेत. महिलांना फ्री असून पुरूषांच्या तिकीटांची किंमत 100 ते 400 पर्यंत इतकी ठेवण्यात आली आहे.
??????????? ????? ??? #TATAWPL ??????? ???????
▶️Gates Open: 4 PM IST
▶️Opening Ceremony: 6:25 PM IST
▶️Match – Gujarat Giants vs Mumbai Indians
▶️Toss: 7:30 PM IST
▶️ Match Start: 8 PM ISTDetails ?https://t.co/7i3bVgItJr
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2023
वुमन्स आयपीएलचे सर्व सामने मुंबईत खेळवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला होता. महिला आणि मुलींना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे. मुलींची क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठं पाऊल उचलल्यासारखं आहे.
मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्यूज, क्लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्ट आणि जिंतामनी कलिटा.
आरसीबी टीम | स्मृति मंधाना (कर्णधार), दिशा कसट, ऋचा घोष, इंदिरा रॉय, एलिस पेरी, सोफी डिवाइन, हेदर नाइट, एरिन बर्न्स, डाने वेन निकर्क, श्रेयंका पाटील, पूनम खेमनर, आशा शोबाना, कनिका अहूजा, रेणुका सिंह ठाकूर, प्रीति बोस, कोमल जैनजद, सहाना पवार आणि मेगन सुचित.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.
गुजरात जायंट्स टीम | बेथ मूनी (कॅप्टन), एश्ले गार्डनर,सोफिया डंकली, एनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन, स्नेह राणा, सब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वारेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ली गाला, अश्विनी कुमारी, परुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.
यूपी वॉरियर्स टीम | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख.