मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 11 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातने दिल्लीला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी दिल्लीला 18.4 ओव्हरमध्ये 136 धावांवर ऑलआऊट केलं. यासह गुजरात या मोसमात आतापर्यंत सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारी टीम ठरली. गुजरातचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला आहे. तर दिल्लीचा या पराभवामुळे क्वालिफाय होण्यासाठी आणखी प्रतिक्षा पाहावी लागणार आहे.
दिल्लीकडून शफाली वर्माने हीने आज निराशा केली.शफाली 8 धावांवर बाद झाली. कॅप्टन मेग लॅनिंग हीने 18 रन्स केल्या. अॅलिस कॅप्सी 22 धावा करुन मैदानाबाहेर गेली. जेमीमाह रॉड्रिग्जने 1 धाव केली. मारिझान कॅप हीने सर्वाधिक 36 रन्स केल्या. जेन जानासेन 4 रन करुन तंबूत परतली. तानिया भाटीयाने 1 धाव केली. अरुंधती रेड्डीने 25 धावा केल्या. राधा यादव 1 रन करुन तंबूत परतली. शिखा पांडे 8 धांवावर नाबाद राहिली. तर पूनम यादव हीला भोपळही फोडता आला नाही.
गुजरातकडून किम ग्रॅथ, तनुजा कवर आणि अॅश्लेग गार्डनर या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन स्नेह राणा आणि हर्लिन देओल या दोघींनी 1 विकेट घेतली.
गुजरात जायंट्सचा दिल्ली कॅपिट्ल्सवर विजय
A fighting knock from Arundhati Reddy comes to an end!
Kim Garth picks her second wicket as Gujarat Giants captain Sneh Rana takes the catch. ??#DC 9 down.
Follow the match ? https://t.co/fWIECCa2QJ #TATAWPL | #DCvGG pic.twitter.com/G6xaEYl4xp
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 16, 2023
त्याआधी टॉस जिंकून दिल्लीने गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. गुजरातकडून लॉरा वोल्वार्ड आणि अॅश्लेग गार्डनर या दोघींनी सर्वाधिक अर्धशतकी खेळी केली. लॉराने 57 धावांची खेळी केली. तिने या खेळीत 45 बॉलमध्ये 6 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. तर गार्डनरने 33 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. हर्लीने देओल हीने 31 रन्सचं योगदान दिलं. सोफिया डंकले 4 आणि हेमलथाने 1 धाव केली. दिल्लीकडून जेस जोनासेन हीने 2 विकेट्स घेतल्या. तर मारिझान कॅप आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, राधा यादव, शिखा पांडे आणि पूनम यादव.
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन | स्नेह राणा (कॅप्टन), सोफिया डंकले, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, अॅश्लेग गार्डनर, दयालन हेमलता, सुषमा वर्मा (विकेटकीपर), किम गर्थ, तनुजा कंवर, मानसी जोशी आणि अश्वनी कुमारी.