मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडिअन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामन्यात दिल्लीने बाजी मारली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने निर्धारित 20 षटकात 109 धावा केल्या. मुंबईकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक 26 धावा तर कर्णधार हरमनप्रीत कौर 23 धावा आणि इस्सी वोंगच्या 23 धावांच्या जोरावर मुंबईला शंभरी पार करता आली. हे आव्हान दिल्लीच्या संघाने 9 विकेट्स राखून जिंकलं. या विजयानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कर्णधार मेग लॅनिंगने अभिनेता शाहरुख खानची पोज रिक्रिएट केली.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने ट्विटरवर व्हिडिओ रिट्विट केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्ससह दिल्ली कॅपिटल्सचे जवळपास सर्व खेळाडू दिसत आहेत.
Qualified for the #TATAWPL play-offs with a special ????? for you ???#YehHaiNayiDilli pic.twitter.com/1FiGIJ9mv8
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 19, 2023
दिल्लीने मुंबईला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. यास्तिका भाटीया, हॅली मॅथ्यूज आणि नॅट ब्रंट या तिघी अनुक्रमे 1,5 आणि 0 धावांवर बाद झाल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि वाँग या दोघींनी प्रत्येकी 23 धावा केल्या.
दरम्यान, पूजा वस्त्राकर हीने सर्वाधिक 26 धाावंचं योगदान दिलं. अमनजोत कौर हीने 19 रन्स जोडल्या. अमेलिया केर हीने 8 धावा केल्या. तर हुमायरा काझी 2 धावांलर नाबाद राहिली. मारिजाने काप, शिखा पांडे आणि जेस जोनासेन या तिकडीने 2 तर अरुंधती रेड्डी हीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.