मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 महामुकाबला हा मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. दिल्लीने या अंतिम सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र मुंबई इंडियन्सने शानदार सुरुवात केली आहे. मुंबईची गोलंदाज इस्सी वाँग हीने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्ज विरुद्ध हॅटट्रिक घेत इतिहास रचला होता. आता तिने हीच कामगिरी या अंतिम सामन्यात सुरु ठेवली आहे. इस्सी वाँग हीने दिल्लीच्या 3 फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. इस्सी हीने दिल्लीच्या डावातील दुसरी ओव्हर टाकली. यामध्ये इस्सीने 2 विकेट्स घेतल्या. तर त्यानंतर चौथ्या षटकातही तिने आणखी एक विकेट घेतली. यामुळे मुंबईने दिल्लीवर मजबूत पकड मिळवली आहे.
इस्सीने आधी ओपनर शफाली वर्मा हीला 11 धावांवर कॅचआऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याच म्हणजे दिल्लीच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर अॅलिस कॅप्सी हीला अमनज्योत कौर हीच्या हाती कॅच आऊट केलं. कॅप्सी हीला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे दिल्लीची 2 ओव्हरनंतर 2 बाद 12 अशी नाजूक स्थिती झाली.
यानंतर कॅप्टन मेग लॅनिंग हीने फटकेबाजी करत स्कोअरकार्ड धावता ठेवला. मात्र पुन्हा इस्सी वाँग पाचव्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आली. या ओव्हरमध्ये तिने दिल्लीची उपकर्णधार जेमिमाह रॉड्रिग्ज्स हीला देखील आऊट केलं. जेमिमाहने 9 धावा करत मैदानाबाहेरचा रस्ता धरला. इस्सीच्या दणक्याने दिल्लीची 3 बाज 35 अशी स्थिती झाली.
इस्सी वाँग हीचा दिल्ली कॅपिट्ल्सला झटका
Issy Wong with her 3️⃣rd ?
Delight for @mipaltan
Jemimah Rodrigues is the latest to depart with #DC now 38-3#TATAWPL | #DCvMI | #Final pic.twitter.com/2j7P5VsQbF
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 26, 2023
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन| हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव आणि शिखा पांडे.