नवी मुंबई | वूमन्स आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धु्व्वा उडवला आहे. मुंबईने गुजरातला विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 15.1 ओव्हरमध्ये 64 धावांवर गुंडाळलं. गुजरातकडून दयालन हेमलथा हीने सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. तर मोनिका पटेलने 10 रन्स केल्या. गुजरातच्या 4 जणींना भोपळाही फोडता आला नाही. या शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
मुंबईचा दणदणीत विजय
The @ImHarmanpreet-led @mipaltan are off the mark in the #TATAWPL in style! #MI win the opening game against #GG by 143 runs ??#TATAWPL | #GGvMI pic.twitter.com/W8GnPXpb4D
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2023
सब्बीनेनी मेघना ही 2 धावा करुन तंबूत परतली. मानसी जोशी आणि अनाबेल सुथरलँड या दोघींनी 6 धावा केल्या. जॉर्जिया वारेहम ही 8 धावा करुन आऊट झाली. स्नेह राणाने फक्त 1 धावा केली. तर मुंबईकडून सायका इशाक हीने 4 विकेट्स घेतल्या.
त्याआधी मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. मुंबईने पहिली विकेट यास्तिका भाटियाच्या रुपात गमावली. यास्तिका अवघी एक धाव करून तंबूत परतली. त्यानंतर हेले मॅथ्यु आणि नॅट क्विवर ब्रंट या जोडीने बाजी सावरली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 50 धावांची भागीदारी केली. यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होणार आहे.हिली मॅथ्यु 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाली. तिला अॅशले गार्डनरनं त्रिफळाचीत केलं. तिने तीन चौकार आणि 4 षटकार ठोकले. तिच्या पाठोपाठ नॅट क्विवर ब्रंटही 18 चेंडूत 23 धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत एकूण 5 चौकार मारले.
त्यानंतर चौथ्या विकेटसाठी हरमनप्रीत कौर आणि एमेला केर या जोडीनं 89 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीतनं 89 तर एमेला नाबाद 45 धावांवर राहिली. पूजा वस्त्राकार 8 चेंडूत 15 धावा करून तंबूत परतली.
मुंबई इंडियन्स महिला संघ | हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता आणि सायका इशाक.
गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी आणि मोनिका पटेल.