WPL 2023 GJ vs RCB : बंगळुरुविरूद्ध हर्लीन देओल आणि सोफिया डंकले यांची वादळी खेळी

| Updated on: Mar 08, 2023 | 9:14 PM

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायन्ट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या गुजरात संघाच्या सोफिया डंकलेने तुफानी खेळी केली आहे.

WPL 2023 GJ vs RCB : बंगळुरुविरूद्ध हर्लीन देओल आणि सोफिया डंकले यांची वादळी खेळी
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायन्ट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या गुजरात संघाच्या सोफिया डंकलेने तुफानी खेळी केली आहे. सोफियाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. अवघ्या 28 बॉलमध्ये तिने 65 धावांची खेळी करत संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. यामध्ये तिने 11 चौकार तर 3 षटकार मारले.

सोफिया डंकले बाद झाल्यावर हर्लीन देओलने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतलीत. हर्लीन हिने 45 बॉलमध्ये 67 धावांची धमाकेदार खेळी केली. दोन्ही खेळाडूंच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरु संघाने 201 धावा केल्या.

दोन्ही संघांनी अजुनही विजयाचा श्रीगणेशा केला नाही, दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुजरात आणि बंगळुरू यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात संघात कोणताही बदल झालेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. दिशाच्या जागी पूनमला संधी मिळाली आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

गुजरात जायन्ट्स संघ | सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हर्लीन देओल, एशले गार्डनर, अन्नाबेल सुथरलँड, सुष्मा वर्मा, दयालन हेमलथा, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कनवार, किम गार्थ, मानसी जोशी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | स्मृती मंधाना (कर्णधार), सोफि डेवि, एलिसे पेरी, हिथर नाईट, रिचा घोष, पूनम खेमनर,कानिका अहुजा, श्रेयंका पाटील, मेगन स्कट, रेणुका सिंह, प्रीती बोस