Mi vs GJ WPl 2023 : ज्याची भीती होती तेच झालं, फक्त 3 धावांनी मोडला IPL च्या पहिल्या विजयाचा रेकॉर्ड

| Updated on: Mar 06, 2023 | 11:29 AM

मुंबईने विजय नाहीतर एक इतिहास लिहून ठेवला आहे जे पुरूष क्रिकेटर्सच्या दोन पाऊले पुढे जात हा एक रेकॉर्ड संघाने केला आहे.

Mi vs GJ WPl 2023 : ज्याची भीती होती तेच झालं, फक्त 3 धावांनी मोडला IPL च्या पहिल्या विजयाचा रेकॉर्ड
Follow us on

Mi vs GJ WPl 2023 : वुमन्स प्रीमिअरल मधील मुंबई इंडिअन्स आणि गुजरात जायंट्समध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने विजयी सलामी दिली आहे. प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या संघाने 200 पेक्षा जास्त धाव काढल्या आणि गुजरातला 208 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. गुजरातची कर्णधार वाघिण बेथ मूनी जखमी झाली आणि संघ ढेपाळला. 200 धावांपेक्षा जास्त लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 64 धावांमध्ये गुजरात संघाचा बाजार आटोपला. मुंबईने गुजरातवर तब्बल 143 धावांनी विजय मिळवला. हा फक्त विजयच नाहीतर एक इतिहासच मुंबई संघाने लिहून ठेवला आहे जे पुरूष क्रिकेटर्सच्या दोन पाऊले पुढे जात हा एक रेकॉर्ड केला आहे.

2008 साली सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला होता. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाने 20 षटकात 222 धावांचा डोंगर उभारला होता. एकट्या ब्रेंडन मॅक्युलमने 158 धावांची धमाकेदार खेळी केली होती.  चिन्नास्वामी  स्टेडिअममध्ये त्यावेळी चौकार आणि षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला होता. मॅक्युलमने 158 धावांच्या खेळीमध्ये 10 चौकार आणि 13 षटकार मारले होते.

कोलकाताच्या या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना  बंगळुरू संघाची दमछाक झाली होती. अवघ्या 82 धावांवरच त्यांचा डाव आटोपला होता. कोलकाताने पहिल्याच सामन्यामध्ये 140 धावांनी विजय मिळवला होता. मात्र आजच्या वुमन्स प्रीमिअर लीगमधील पहिल्याच सामन्यात हा रेकॉर्ड मोडला गेला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने गुजरातवर  143 धावांनी विजय मिळवला आहे.

मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 15.1 ओव्हरमध्ये 64 धावांवर गुंडाळलं. गुजरातकडून दयालन हेमलथा हीने सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. तर मोनिका पटेलने 10 रन्स केल्या. गुजरातच्या 4 जणींना भोपळाही फोडता आला नाही. या शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

मुंबई इंडियन्स महिला संघ – यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता, सायका इशाक

गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी, मोनिका पटेल