DC vs RCB WPL 2023 : इथंही तिच तऱ्हा! आरसीबीचा सलग पाचवा पराभव

| Updated on: Mar 13, 2023 | 11:41 PM

आरसीबीला पहिल्या पर्वामध्ये अद्यापही विजयाच खातं उघडता आलं नाही. दिल्ली संघाचा एक पराभव सोडता सर्व सामने जिंकले असून गुणतालिकेमधील दुसरं स्थान भक्कम केलं आहे.

DC vs RCB WPL 2023 : इथंही तिच तऱ्हा! आरसीबीचा सलग पाचवा पराभव
Follow us on
मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यामध्ये स्मृती मंधानाच्या संघाचा पराभव झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 150 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलागा करताना दिल्ली संघाने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. आरसीबीला पहिल्या पर्वामध्ये अद्यापही विजयाच खातं उघडता आलं नाही. दिल्ली संघाचा एक पराभव सोडता सर्व सामने जिंकले असून गुणतालिकेमधील दुसरं स्थान भक्कम केलं आहे.
आरसीबीची सावध सुरूवात केली होती मात्र पाचव्या षटकात स्मृती मंधाना 18 धावा करून बाद झाली.
सोफी डिव्हाईनने धावा काढायला सुरूवात केली नाही तर 21 धावांवर तिला शिखा पांडेने बोल्ड केलं. त्यानंतर एलिसा पेरीने एकटीने आरसीबी संघाची कमान आपल्या खांद्यावर घेतली आणि दिल्लीच्या गोलंदाजांना फोडून काढायला सुरूवात केली.
पेरीने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली यामध्ये तिने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. पेरी बाद झाल्यावर युवा खेळाडू रिचा घोषने 16 चेंडूत 37 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. दिल्लीच्या शिखा पांडेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
दिल्लीचीही  सुरूवात खराब झाली, दुसऱ्याच चेंडूवर शफाली वर्मा शून्यावर बाद  झाली. कर्णधार मेग लॅनिंगलाही मोठी खेळी करता आली नाही. 15 धावा करून ती परतली. दिल्लीच्या जेमिमा एलिसा कॅपसे यांनी दांडपट्टा चालवला जेमिमा 32 धावांवर तर कॅपसे 38 धावांवर बाद झाली. त्यानंतर आलेल्या  मारिझान कॅप नाबाद 32 आणि जेस जोनासेन यांनी नाबाद 29 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.