मुंबई : अवघ्या काही तासांमध्ये वुमन्स आयपीएलच्या पहिल्या (WPL 2023) सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिल्या पर्वातील पहिला सामना हे मुंबई इंडिअन्स आणि गुजरात जायंट्स (Mumbai vs Gujarat WPL) यांच्यात होणार आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी गुजरातच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजची खेळाडू डिआंड्रा डॉटिन यंदाच्या मोसमातून बाहेर झाली आहे. गुजरातने पाण्यासारखा पैसा ओतून संघात घेतलं होतं. मात्र तीच खेळाडू स्पर्धेच्या सुरूवातीला बाहेर झाल्यानं संघासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिआंड्रा डॉटिन अजुनही फिट झाली नाही. वुमन्सच्या लिलावामध्ये तिला 60 लाख खर्च करत गुजरात संघाने आपल्या ताफ्यात घेतलं होतं. डिआंड्राची 50 लाख इतकी बेस प्राईज होती. डिआंड्रा बाहेर झाल्याने तिच्या जागी संघात ऑस्ट्रेलियाच्या किम गर्थला घेण्यात आलं होतं. किम ही उजव्या हाताची फलंदाज असून लिलावामध्ये तो अनसोल्ड राहिली होती. किम ही आताच टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सदस्य होती.
पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. बदल करण्यात आलेल्या भारतीय वेळेनुसार सामना 8 वाजता सुरू होणार आहे. सामन्याचा टॉस हा 7.30 वाजता होणार आहे. जी वेळ ठरली होती त्यामध्ये का बदल केला जात आहे याची माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. मात्र उद्घाटन सोहळ्यामुळे हा बदल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरात जायंट्स टीम | बेथ मूनी (कॅप्टन), एश्ले गार्डनर,सोफिया डंकली, एनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन, स्नेह राणा, सब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वारेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ली गाला, अश्विनी कुमारी, परुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.
मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्यूज, क्लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्ट आणि जिंतामनी कलिटा.