मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. या तिसऱ्या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स आयपीएलच्या पहिल्या पर्वाची सुरुवात ही 4 मार्चपासून होत आहे. या स्पर्धेत एकूण 5 टीम सहभागी होणार आहेत. त्याआधी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार आणि उपकर्णधाराची घोषणा केली आहे.
टीम इंडियाची स्टार बॅट्समन मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्ज हीला दिल्ली कॅपिट्ल्सचं उपकर्णधार करण्यात आलं आहे. तर ऑस्ट्रेलियाला वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2023 मध्ये चॅम्पियन करणाऱ्या मेग लॅनिंग हीच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
जेमिमाहने 21 वनडे आणि 80 टी 20 सामने खेळले आहेत. यात तिने अनुक्रमे 394 आणि 1 हजार 704 धावा केल्या आहेत. तर लॅनिंगने ऑस्ट्रेलियाचं 6 टेस्ट, 103 वनडे आणि 132 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये तिने अनुक्रमे 345, 4602 आणि 3405 धावा केल्या आहेत. तर लॅनिंगने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला 5 आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत.
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर वूमन्स आयपीएलचं आयोजन करण्यात आलं आहे.या पहिल्या पर्वात एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत.मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिट्ल्स असे 5 टीम्स आहेत.
हरमनप्रीत कौर – मुंबई इंडियन्स
मेग लॅनिंग – दिल्ली कॅपिट्ल्स
यूपी वॉरियर्स – एलिसा हीली
आरसीबी -स्मृती मंधाना
गुजरात जायंट्स – बेथ मूनी.
मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्यूज, क्लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्ट आणि जिंतामनी कलिटा.
टीम आरसीबी | स्मृति मंधाना (कर्णधार), दिशा कसट, ऋचा घोष, इंदिरा रॉय, एलिस पेरी, सोफी डिवाइन, हेदर नाइट, एरिन बर्न्स, डाने वेन निकर्क, श्रेयंका पाटील, पूनम खेमनर, आशा शोबाना, कनिका अहूजा, रेणुका सिंह ठाकूर, प्रीति बोस, कोमल जैनजद, सहाना पवार आणि मेगन सुचित.
टीम दिल्ली कॅपिट्ल्स | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.
टीम गुजरात जायंट्स | बेथ मूनी (कॅप्टन), एश्ले गार्डनर,सोफिया डंकली, एनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन, स्नेह राणा, सब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वारेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ली गाला, अश्विनी कुमारी, परुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.
यूपी वॉरियर्स | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख.