WPL 2024, GG vs UPW : टॉस जिंकून गुजरातने घेतली फलंदाजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची धाकधूक वाढली

| Updated on: Mar 11, 2024 | 7:13 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 17 व्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. टॉप 3 साठीचा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यातील निकालावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे बंगळुरुही गुजरात जिंकावं अशीच प्रार्थना करत असेल.

WPL 2024, GG vs UPW : टॉस जिंकून गुजरातने घेतली फलंदाजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची धाकधूक वाढली
WPL 2024, GG vs UPW : नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 19 व्या सामना गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने लागला. गुजरातने दिल्लीत सुरु असलेल्या ट्रेंडप्रमाणे प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. आता युपीसमोर मोठं आव्हान देण्यासाठी धडपड असणार आहे. दरम्यान या सामन्यावर तीन संघांचं भवितव्य अवलंबून आहे. दिल्ली आणि मुंबई संघाने टॉप 3 मध्ये एन्ट्री मारली आहे. तर तर तिसऱ्या संघासाठी तीन संघांमध्ये चुरस आहे. आजचा सामना गुजरातने जिंकला तर ही चुरस आणखी वाढणार आहे. पण हा सामना युपी वॉरियर्सने जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. त्यामुळे जर तरच्या गणितात साखळी फेरीतील उर्वरित तीन सामने अडकले आहेत.

गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनी म्हणाली की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आमच्यासाठी प्रथम फलंदाजी करणे आणि स्कोअर बोर्डवर धावा करणे हे महत्त्वाचं काम आहे. आम्हाला काही संघांना अस्वस्थ करण्याची खरी संधी मिळाली आहे. आमच्या संघात आज एक बदल केला आहे.” युपीची कर्णधार एलिसा हिलीने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करूनही काम पूर्ण केलं आहे. आम्हाला दोन दिवसांची छान सुट्टी मिळाली आहे. स्पर्धेत जिवंत राहण्यासाठी आम्हाला विजयाची गरज आहे. नक्कीच आम्ही ते पूर्ण करून. आमच्या संघात तीन बदल आहेत.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम शकील.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, सायमा ठाकोर, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी.