बंगळुरु | वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स टीमने विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स टीमची विजयी घोडदौड थांबवली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने आरसीबीला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 195 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानचा पाठलाग करताना कॅप्टन स्मृती मंधाना हीने तडाखेदार खेळी केली. मात्र इतरांनी सपशेल निराशा केली. त्यामुळे दिल्लीचा विजय झाला. आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 169 धावाच करता आल्या. आरसीबीचा यंदाच्या पर्वातील हा पहिला पराभव ठरला.
आरसीबीने 195 धावांचा पाठलाग करताना तडाखेदार सुरुवात केली. कॅप्टन स्मृती मंधाना आणि सोफी डेव्हाईन या दोघांनी 77 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर सोफी 23 धावांवर आऊट झाली. स्मृतीने दुसऱ्या बाजूने तडाखा सुरुच ठेवला होता. स्मृतीने डब्ल्यूपीएलमधील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर स्मृतीने टॉप गिअर टाकत वादळी खेळी केली.
स्मृतीच्या फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने झटपट 100 टप्पा पार केला. मात्र नको तेच झालं. दिल्लीला स्मृतीची सर्वात मोठी विकेट मिळाली. मारिझान कॅप हीने स्मृतीला 74 धावांवर क्लिन बोल्ड करत सामना आपल्या बाजूने फिरवला. स्मृतीनंतर सभिनेनी मेघना हीने 36 धावा केल्या. तर विकेटकीपर रिचा घोष हीने 19 धावा केल्या. त्यानंतर मात्र आरसीबीच्या शेवटच्या फलंजाजंनी सपशेल निराशा केली. आशा शोभना झिरोवर आऊट झाली. श्रेयांका पाटील 1 धावेवर नाबाद परतली. तर इतरांनी आपली विकेट गिफ्ट म्हणून दिली.
दिल्लीकडून जेस जोनासेन हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.मारिझान कॅप हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शिखा पांडेच्या खात्यात 1 विकेट गेली. त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीकडून शफली वर्मा हीने 50 धावा केल्या. ॲलिस कॅप्सी हीने 46 धावा जोडल्या. मारिझान काप हीने 32 धावांचं योगदान दिलं. तर जोनासेन आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी अखेरीस निर्णायक खेळी केली. जोनासेन नाबाद 36 आणि अरुधंती रेड्डी हीने 10 धावा केल्या. तर आरसीबीकडून एस डेविने आणि नदिन डी क्लर्क या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर श्रेयांका पाटीलच्या खात्यात 1 विकेट गेली.
आरसीबीने इथेच सामना गमावला
Turning point.
This moment.
This wicket. pic.twitter.com/SyQsJO5C1O— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 29, 2024
दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेईंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव आणि शिखा पांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेईंग इलेव्हन | स्मृती मंधाना (कॅप्टन), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, नदिन डी क्लर्क, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.