मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाचा सामना सुरु आहे. या स्पर्धेतील विजय दोघांपैकी एका संघाला टॉपला ठेवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड सुरु आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. ठरल्याप्रमाणे मुंबईने दव फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून गोलंदाजी स्वीकारली. पण दिल्लीला होम ग्राउंडचा फायदा असल्याचं विसरून गेले. पहिल्या चेंडूपासून दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली. शफाली वर्माने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून धावांचा नारळ फोडला. कारण दुसऱ्या डावात गोलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड होतं म्हणून मोठी धावसंख्या करणं गरजेचं होतं. त्यानुसार फलंदाजांनी आडवा पट्टा मारण्यात कोणतीच कसर सोडली नाही. मेग लेनिंगने 38 चेंडूत 53 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर प्रेक्षकांना जेमिमाचं वादळ पाहायला मिळालं.
जेमिमा रॉड्रिग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 209.9 च्या स्ट्राईक रेटने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. 33 चेंडूत 69 धावांची खेळी केली. जेमिमाच्या आक्रमक खेळीमुळे मुंबईचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. तिला बाद करण्यासाठी हवं ते केलं. पण जेमिमा या सर्वांना उरून पुरली. तिने 3 उत्तुंग षटकार आणि 8 चौकार ठोकले. या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला 4 गडी गमवून 20 षटकात 192 धावांपर्यंत मजल मारता आली. जेमिमा शेवटपर्यंत नाबाद राहिली.
Dilli ki Jemi 🫶pic.twitter.com/LFFviWmDA8
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 5, 2024
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, एस सजना, अमनजोत कौर, हुमैरा काझी, सायका इशाक, शबनीम इस्माईल.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, तीतास साधू, शिखा पांडे, राधा यादव.