नवी दिल्ली | वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात आज 17 मार्च रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहे. उभयसंघातील महामुकाबला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल. स्मृती मंधाना हीच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर मेग लॅनिंग दिल्लीची सूत्रं सांभाळणार आहे. या सामन्याआधी दोघांपैकी सरस कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स आरसीबीवर पूर्णपणे वरचढ राहिली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात आरसीबीवर कडवं आव्हान असणार आहे. आतापर्यंत डब्ल्यूपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ एकूण 4 वेळा आमनेसामने आले आहेत. दिल्लीने या चारही सामन्यात आरसीबीचा धुव्वा उडवलाय. आरसीबीला दिल्ली विरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात आरसीबीसमोर कडवं आव्हान असणार आहे.
दरम्यानत दिल्ली कॅपिट्ल्सने यंदाच्या मोसमात साखळी फेरीत 8 पैकी 6 सामन्याच विजय मिळवला. दिल्लीने सर्वाधिक विजयांसह फायनलमध्ये थेट धडक मारली. तर आरसीबीने एलिमिनेटर सामन्यात गत विजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. आरसीबीची साखळी फेरीत 50 टक्के कामगिरी राहिली. आरसीबीने 8 पैकी 4 सामने जिंकले तर तितकेच गमावलेही.
दिल्ली कॅपिट्ल्स फायनलसाठी सज्ज
Our tigresses are ready to 𝐑𝐎𝐀𝐑 on the biggest stage 🏆🦁#YehHaiNayiDilli #DCvRCB #TATAWPLFinal pic.twitter.com/TyazVY4FD3
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 17, 2024
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ | मेग लॅनिंग (कॅप्टन), तानिया भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, मिन्नू मणी, अश्विनी कुमारी, अपर्णा मंडल, तितस साधू, स्नेहा दीप्ती , ॲनाबेल सदरलँड, लॉरा हॅरिस आणि पूनम यादव.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स टीम | स्मृती मंधाना (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, दिशा कासट, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादूर, इंद्राणी रॉय, शुभा सतिश, इंद्रनीश मेघना, नादिन डी क्लर्क, केट क्रॉस आणि एकता बिश्त.