नवी दिल्ली | वूमन्स प्रीमिअर लीग 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील अखेरचे 2 सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. तर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सचं पॅकअप झालंय. दिल्ली कॅपिट्ल्सने साखळी फेरीत सर्वाधिक सामने जिंकले. दिल्ली यासह टेबल टॉपर ठरली. दिल्लीने यासह डब्ल्यूपीएल फायनलचं तिकीट मिळवलं. आता दिल्लीसोबत अंतिम फेरीत कोणती टीम भिडणार हे 15 मार्च रोजी निश्चित होणार आहे.
डब्ल्यूपीएल 2024 मधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात होणार आहे. हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कॅप्टन्सी करणार आहे. या दोन्ही संघातील एलिमिनेटर सामना कुठे आणि कधी होणार? तसेच सामना कुठे पाहता येणार? हे सर्वकाही सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील एलिमिनेटर सामना शुक्रवारी 15 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील एलिमिनेटर सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
एमआय विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
एमआय विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
मुंबई इंडियन्स वूमन्स टीम | हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रियांका बाला (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, एस सजना, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, फातिमा कीर्थना बालकृष्णन, इस्सी वोंग, यास्तिका भाटिया, जिंतिमणी कलिता आणि अमनदीप कौर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स टीम | स्मृती मानधना (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादुर, शुभा सतीश, नदीन डी क्लार्क, सभिनेनी मेघना, केट क्रॉस आणि एकता बिष्ट.