नवी दिल्ली | वूमन्स प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेतील अखेरचा सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्साही आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शुक्रवारी 15 मार्च रोजी गत विजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली. सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात आरसीबीने मुंबईचा 5 धावांनी धुव्वा उडवला. तर त्याआधी टेबल टॉपर असल्याने दिल्ली कॅपिट्ल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध आरसीबी यांच्यात डब्ल्यूपीएल ट्रॉफीसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
मेग लॅनिंग हीच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्सने 8 पैकी 6 सामने जिंकले. दिल्लीची ही सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएल फायनलमध्ये पोहचण्याची वेळ ठरली. तर आरसीबीने मुंबईचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग केलं. दरम्यान दिल्ली विरुद्ध आरसीबी महाअंतिम सामना कधी आणि कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.
दिल्ली विरुद्ध आरसीबी अंतिम सामना रविवार 17 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
दिल्ली विरुद्ध आरसीबी अंतिम सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
दिल्ली विरुद्ध आरसीबी अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
दिल्ली विरुद्ध आरसीबी अंतिम सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटर्वकवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
दिल्ली विरुद्ध आरसीबी अंतिम सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ | मेग लॅनिंग (कॅप्टन), तानिया भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, मिन्नू मणी, अश्विनी कुमारी, अपर्णा मंडल, तितस साधू, स्नेहा दीप्ती , ॲनाबेल सदरलँड, लॉरा हॅरिस आणि पूनम यादव.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स टीम | स्मृती मंधाना (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, दिशा कासट, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादूर, इंद्राणी रॉय, शुभा सतिश, इंद्रनीश मेघना, नादिन डी क्लर्क, केट क्रॉस आणि एकता बिश्त.