मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं दुसरं पर्व एकदम रंगतदार झालं. गेल्या वर्षीच्या तुलनेत या स्पर्धेकडे क्रीडारसिकांचा ओढा जास्त राहिला. एक एक सामने तोडीस तोड झाले. त्यामुळे कोणता सामना कधी फिरेल सांगता येत नाही. असताना दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून दिल्ली कॅपिटल्सला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये मुंबईला 5 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चार वेळा आमनेसामने आले आहेत. चारही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या काही खेळाडूंचा फॉर्म पाहता सामना वाटतो तितका सोपा जाणार नाही. दिल्लीच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणण्याची क्षमता बंगळुरुच्या खेळाडूंमध्ये आहे.
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एलिस पेरी ऑरेंज कॅपची मानकरी आहे. आतापर्यंत एलिस पेरीने 8 सामने खेळले असून 312 धावा केल्या आहेत. यात प्लेऑफमध्ये ठोकलल्या 66 धावा सर्वोत्तम आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार तिच्या मागोमाग 308 धावांवर आहे. त्यामुळे या दोन फलंदाजांमध्ये वरचढ कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्मृती मंधानाची बॅटही चांगली चालली असून 269 धावा केल्या आहेत. दिल्लीची शफाली वर्मा आणि बंगळुरुची रिचा घोष यांचीही जुगलबंदी पाहायला मिळेल. तर दिल्लीची जेमिमा रॉड्रिग्स आणि एलिस कॅप्से कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतात.
दिल्लीकडून मॅरिझेन कॅप ही सर्वात घातक गोलंदाज ठरली आहे. तिने सहा सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीची जेस जोनासेन आणि राधा यादवही या देखील मागे नाहीत. बंगळुरुकडून आशा शोभना हीनेही 10 विकेट्स, तर सोफी मोलिनेक्सने 9 विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, तितास साधू, शिखा पांडे, राधा यादव
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिना वेरेहम, श्रेयंका पाटील, श्रद्धा पोखरकर, आशा शोबाना, रेणुका सिंग.
टीम 1- ऋचा घोष (विकेटकीपर), मेग लॅनिंग, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस पेरी (कर्णधार), सोफी डेव्हाईन, मेरिझान कॅप (उपकर्णधार), एलिस कॅप्से, जेस जोनासेन, राधा यादव.
टीम 2- ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृती मंधाना, मेग लॅनिंग, शफाली वर्मा, एलिस पेरी (कर्णाधार), मेरिझान कॅप, एलिस कॅप्से, जेस जोनासेन (उपकर्णधार), तितास साधू, सोफी मोलिनेक्स