मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मृती मंधाना हिचा हा निर्णय खरा ठरला. गोलंदाजांनी अपेक्षित गोलंदाजी केली आणि गुजरातला अवघ्या 107 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 108 धावांचं आव्हान मिळालं आहे. 120 चेंडूत 108 धावा करणं टी20 क्रिकेटमध्ये सहज सोपं आहे. त्यामुळे गुजरातच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. आता गुजरातचे गोलंदाजी दिलेलं आव्हान रोखतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गुजरातचा डाव अडखळत सुरु झाला. बेथ मूनीच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या 8 धावांवर असताना तंबूत परतली. त्यानंतर फोइबे लिचफिल्डही काही खास करू शकली नाही. 5 धावा करून रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाली. वेदा कृष्णमूर्तीकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र या अपेक्षांचा भंग झाला. 9 धावा करून माघारी परतली. एकीकडे फलंदाज झटपट बाद होत होते तेव्हा हरलीन देओलने मोर्चा सांभाळला होता. पण दुर्दैवाने 22 धावांवर रनआऊट झाली आणि सर्वकाही फिस्कटलं. अशले गार्डनर काहीतरी खास करेल असं वाटलं होतं. पण तिचा डावही 7 धावांवर आटोपला. दयालान हेमलथाने सर्वाधिक नाबाद 31 धावा केल्या. या व्यतिरिक्त तळाचा एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. कॅथरीन ब्रायस 3, स्नेह राणा 12 धावा करून बाद झाले.
बंगळुरुकडून सोफी सोभना हीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्यानतर रेणुका ठाकुर हीला दोन गडी बाद करण्यात यश आलं. तर जॉर्जिया वारेहम हीने एक गडी बाद केला. आता बंगळुरु दिलेलं आव्हान झटपट पूर्ण गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाण्यासाठी प्रयत्न करेल.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, ली ताहुहू, मेघना सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग