मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 171 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. मुंबईला शेवटच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना एस सजना हीने उत्तुंग षटकार ठोकला. त्यामुळे दिल्लीचा मागचा पराभवाचा वचपा काढणं स्वप्नच राहिलं. या सामन्यात मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटिया यांनी दमदार कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून एस सजना सर्व क्रेडीट नेलं. पण सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने भलत्यालाच दिलं. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच आहे.
“शेवट खूपच गोड झाला. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे खरोखर आनंद झाला. याचे श्रेय मला माझे फलंदाजी प्रशिक्षक हिमांशू भैया यांना द्यायला आवडेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर माझ्यात आत्मविश्वास नव्हता, त्याने माझ्याकडून कठोर सराव करून नवीन ऊर्जा दिली. मी देशांतर्गत क्रिकेट खेळत नव्हते, मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होते. मानसिकदृष्ट्या त्या ब्रेकने मला मदत केली. फलंदाजी करताना विकेट चांगली दिसत होती, आम्ही विचार केला की आम्ही खेळ खोलवर नेला तर आम्हाला वाटले की आम्ही जिंकू शकू.”
“सजना सराव सत्रात षटकार मारत होती आणि तिने आज रात्री आम्हाला ते करून दाखवले. आम्ही पहिल्या 3 चेंडूत खेळ संपवू पाहत होतो पण आम्हाला माहित आहे की आमच्या फलंदाजीमध्ये डेप्थ आहे. सजना होती म्हणून टेन्शन नव्हतं, त्यामुळेच मी इथे उभी आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या फलंदाजीने काही फरक पडत नाही, फक्त परिस्थिती महत्त्वाची असते आणि त्यानुसार आपण काम करतो.”, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.
Naino mein sapna. Sapnon mein Sajana. 🥹🔥
(Admit it, you sang it!) #OneFamily #AaliRe #MumbaiIndians #TATAWPL #MIvDC
— Mumbai Indians (@mipaltan) February 23, 2024
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.