मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पराभूत केलं होतं. आता गुजरात जायंट्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच गुजरात जायंट्स मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. गुजरातचा संघ २० षटकात ९ गडी गमवून १२६ धावा करू शकला. तर मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १२७ धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने ५ गडी गमवून १८.१ षटकात पूर्ण केलं. स्पर्धेतील सलग दोन सामने जिंकत मुंबईने आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. आता पुढच्या दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स यांचा सामना करायचा आहे.
मुंबईकडून हरमनप्रीत कौर हीने कॅप्टन इनिंग खेळली. सुरुवातील दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर नॅट सायव्ह ब्रंट आणि अमेलिया केरसोबत चांगली भागीदारी केली. तसेच शेवटपर्यंत नाबाद ४६ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. यास्तिका भाटिया ७, हेली मॅथ्यूज २, नॅट स्कायव्हर ब्रंटच २२, अमेलिया केर ३१ आणि पूजा वस्त्राकार १ धाव करून बाद झाली. गुजरातकडून तनुजा कन्वारने २, ली ताहूहू १ आणि कार्थिन ब्रायसने एक गडी बाद केला.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, ली ताहुहू, मेघना सिंग.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.