मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सवर दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेत युपी वॉरियर्सने 7 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्या पराभवाचा वचपा मुंबईने दुसऱ्या टप्प्यात काढला. या विजयासह मुंबई इंडियन्सचं टॉप 3 च्या दिशेने पाऊल पडलं आहे. तर युपी वॉरियर्सचा टॉप 3 मधील प्रवास आणखी खडतर झाला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 160 धावा केल्या आणि विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं. पण युपी वॉरियर्सला हे आव्हान गाठणं कठीण गेलं. युपी वॉरियर्सला 20 षटकात 7 गडी गमवून 118 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सवर 42 धावांनी विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक राहिली. हिली मॅथ्यूजच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या 4 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर यास्तिका भाटियाही काही खास करू शकली नाही. नॅट सायव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी डावा सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरमनप्रीतने अमेलिया केरसोबत डाव पुढे नेला. 28 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौर झटपट धावा घेण्यात अपयशी टऱील. तर अमेलियाने 23 चेंडूत 39 धावा केल्या.
युपी वॉरियर्सचा डाव पत्त्यासारखा कोसळला. मुंबईने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. एलिसा हिली 3, किरण नवगिरे 7, चमारी अथापट्टू 3, ग्रेस हॅरिस 1, श्वेता सेहरावत 17, पूनम खेमनार 7, सोफी एक्सलस्टोन 0, उमा छेत्री 8, साइका ठाकोर 0 धावांवर बाद झाली. दीप्ती शर्माने एकाकी झुंज दिली.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, उमा चेत्री, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर.