मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात अनेक रंगतदार सामन्यांची मेजवानी आतापर्यंत पाहायला मिळाली. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. तसेच बाद फेरीत टॉप 3 संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, युपी वॉरियर्स यांच्यात चुरस आहे. तर गुजरात जायंट्सचं गणित युपी आणि बंगळुरुवर अवलंबून आहे. असं असताना टॉप 3 मध्ये क्वॉलिफाय झालेल्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. कारण अव्वल स्थान गाठण्यासाठी या दोन्ही संघांची धडपड असणार आहे. दोन्ही संघांचे साखळी फेरीत प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासोबत रनरेट कायम ठेवण्याचं आव्हान आहे. कारण अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरी खेळणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला अंतिम फेरीसाठी सामना करावा लागेल. त्यामुळे थेट अंतिम फेरी गाठण्याचं लक्ष्य असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांचे प्रत्येकी 10 गुण आहेत. तसेच साखळी फेरीतील एक सामना शिल्लक आहे. मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात जायंट्ससोबत आहेत. या दोन्ही संघांना 12 गुण मिळवण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने शेवटचा सामना जिंकला तर प्रत्येकी 12 गुण होतील. त्यामुळे अंतिम फेरीचं तिकीट रनरेटवर ठरेल. दुसरीकडे, एकाने सामना गमवला आणि एकाने जिंकला तर गुणांच्या आधारे एक संघ अंतिम फेरीत जाईल. पण दोघांनी सामना सामना गमावला तर रनरेटच्या आधारावरच गणित ठरेल. कारण सध्या तळाशी असलेल्या तीन संघांना 10 गुणांची बेरीज करता येणार नाही.
तिसऱ्या संघासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या संघात चुरस आहे. सर्वकाही एकमेकांवर आधारीत आहे. गुजरात जायंट्सचे अजूनही दोन सामने शिल्लक असल्याने बंगळुरु आणि युपीची धाकधूक वाढली आहे.
यल चॅलेंजर्स बंगळुरुचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्ससोबत आहे. हा सामना बंगळुरुने जिंकल्यास तिसरं कायम ठेवता येऊ शकतं. कारण सध्यातरी बंगळुरुचा रनरेट चांगला आहे. युपीने गुजरातविरुद्धचा सामना गमावला तर बंगळुरुला सहज टॉप थ्रीमध्ये एन्ट्री मिळेल. पण जिंकला तर मात्र रनरेटवर सर्वकाही ठरेल.
दुसरीकडे, गुजरात जायंट्सलाही तितकीच संधी आहे. कारण बंगळुरु आणि युपीने शेवटचा सामना गमावला तर गुजरातला संधी आहे. गुजरातला यासाठी शेवटचे दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. तसेच रनरेट चांगला ठेवावा लागेल. पण हे गणित पूर्णत: नशिबाचा खेळ असणार आहे. त्यामुळे युपी विरुद्ध गुजरात सामन्यावरच बंगळुरुचं सर्वकाही अवलंबून असेल.