WPL 2024, Video : युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिलीचा दुर्गावतार, मैदानात घुसलेल्या चाहत्याला अशा शिकवला धडा

| Updated on: Feb 29, 2024 | 2:37 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सहावा सामना युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. हा सामना युपी वॉरियर्सने 7 गडी राखून जिंकला. युपी वॉरियर्सच्या कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू एलिसा हिली हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यात एक प्रसंग असा आला की एलिसा हिलीचा दुर्गावतार पाहायला मिळाला.

WPL 2024, Video : युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिलीचा दुर्गावतार, मैदानात घुसलेल्या चाहत्याला अशा शिकवला धडा
WPL 2024, Video : युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिली बाहुबलीच्या भूमिकेत, मैदानात घुसलेल्या चाहत्याला थेट भिडली
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत युपी वॉरियर्सने पहिला विजय मिळवला आहे. स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर तिसरा सामना मुंबई इंडियन्सशी होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात 6 गडी गमवून 161 धावा केल्या आणि विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं. युपी वॉरियर्सने हे आव्हान 16.3 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात युपी वॉरियर्सच्या किरण नवगिरेचं वादळ पाहायला मिळालं. 31 चेंडूत 57 धावांची खेळी करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दुसरीकडे, या सामन्यात ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू आणि युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिली हिचं बाहुबली रुप पाहायला मिळालं.

नेमकं काय झालं?

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 161 धावा केल्या. पण शेवटच्या षटकावेळी एका फॅन्सने मैदानात धाव घेतली. विकेटकीपिंग करणाऱ्या एलिसा हिलीने फॅन्सला पाहिलं आणि तिथेच भिडली. तिने फॅनला पुढे जाण्यापासून रोखलं. त्यानंतर सुरक्षारक्षक आले आणि त्यांनी त्याला मैदानाबाहेर काढलं. आता हिलीचा दुर्गावतारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूआधी झाली. वेगवान गोलंदाज अंजली सरवानी हीने सजीवन सजनाला बाद केल्यानंतर खेळ पुन्हा सुरु होण्यासाठी काही वेळ थांबवण्यात आला.

स्पर्धेतील पहिला विजय मिळवल्यानंतर कर्णधार एलिसा हिली हीने आनंद व्यक्त केला आहे. सामन्यानंतर सांगितलं की, “मी संघाच्या कामगिरीने खूपच खूश आहे. “मुंबई इंडियन्ससारख्या संघाला पराभूत करून जबरदस्त पुनरागमन केलं आहे. मी किरण नवगिरे हिला विचारलं की, सलामीला उतरणार का? कारण तिला ओपनिंग करायची इच्छा होती.”

“मुंबईने 25 धावा अतिरिक्त केल्या. फिल्डिंगमध्ये काही त्रुटी होत्या. पण फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तर गोलंदाजांनी आम्हाला सामन्यात ठेवलं. आम्ही भारतात असंच खेळो. मला संघाचा अभिमान आहे. पण अजून स्पर्धेत बरंच काही करायचं आहे.”, असंही एलिसा हिली हीने पुढे सांगितलं. एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांची पत्नी आहे.