मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चुरस वाढली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. पण त्यांच्यातही अव्वल स्थान गाठण्यासाठी चुरस आहे. तर टॉप 3 मध्ये स्थान मिळवण्यासाठी 3 संघामधील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. गुजरात जायंट्सने युपी वॉरियर्स संघाला धावांनी पराभूत केल्याने गुणतालिकेतील गणित जर तरवरच अवलंबून आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील निकालावर आता सर्वकाही अवलंबून असणार आहे. दरम्यान, गुजरात जायंट्सने नाणेफेीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. 20 षटकात 8 गडी गमवून 152 धावा केल्या आणि विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना युपीच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. त्यामुळे धावांमधील अंतर वाढत गेलं. सातव्या षटकात 35 धावांवर निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि पूनम खेमनार यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही यश आलं नाही.
गुजरातकडून सलामीला आलेल्या वॉल्वार्ट आणि बेथ मूनी या जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 60 धावांची भागीदारी केली. वॉल्वार्टने 30 चेंडूत 43 धावा केल्या. तर बेथ मूनीने शेवटपर्यंत किल्ला लढवला. 52 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. हेमलथा 0, फोइबे लिचफिल्ड 4, गार्डनर 15, भारती फुलमली 1, ब्रायस 11, तनुजा कंवर 1 आणि शबनम शकील 0 धावांवर बाद झाली.
युपी वॉरियर्सची सुरुवात एकदमच वाई झाली.अवघ्या धावांवर एलिसा हिली बाद झाली. त्यानंतर किरण नवगिरेला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर आलेली चमिरा अट्टापट्टू आली तशी माघारी परतली. ग्रेस हॅरिसने 1 धावा केली बाद झाली. तर श्वेता सेहरावतने 8 धावा केल्या तंबूत परतली. दीप्ती शर्मा आणि पूनम खेमनारने शेवटपर्यंत झुंज दिली. दीप्ती शर्माने नाबाद 88 आणि पूनम खेमनारने नाबाद 36 धावांची खेळी केली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकला तर टॉप थ्रीमधील बंगळुरुचं स्थान निश्चित होईल. पण जर या सामन्यात पराभव झाला तर मात्र रनरेटवर फैसला लागेल. त्यामुळे बंगळुरुचा प्रयत्न मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना जिंकण्याचा असेल. दुसरीकडे, टॉपला राहून थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबईची धडपड असणार आहे.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम शकील.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, सायमा ठाकोर, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी.