मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 11व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स आमनेसामने आले. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौलही तितकाच महत्त्वाचा आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेण्याचा ट्रेंड आहे. त्याला दव फॅक्टर हे कारणीभूत आहे. त्यामुळे नाणफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला की लागला प्रथम गोलंदाजी स्वीकारली जात आहे. या सामन्यात युपी वॉरियर्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. त्यामुळे बंगळुरुला काही करून धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं होतं. कारण 150 च्या आसपास धावा आरामात चेस होताना पाहिलं गेलं आहे. हाच अंदाज बांधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजानी आक्रमक पवित्रा घेतला. सब्भनेनी मेघना आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि एलिसा पेरी यांच्यात 95 धावांची पार्टनरशिप झाली. त्यानंतर एलिसा पेरी आणि रिचा घोष यांनी 42 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाने आक्रमकपणे 50 चेंडूत 80 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. आक्रमक शैली पाहून युपी वॉरियर्सचे गोलंदाज मेटाकुटीला आले होते. दीप्ती शर्मा गोलंदाजी करत असताना त्याचा परिणाम दिसून आला.
युपी वॉरियर्सने 11 वं षटक दीप्ती शर्माकडे सोपवलं. तेव्हा स्मृती मंधानाने 28 चेंडूत 40 धावांची खेळी केली होती. पहिल्या चेंडूवर स्मृतीने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडू पेरीला निर्धाव टाकण्यात यश आलं. तिसऱ्या चेंडूवर पेरीने एक धाव घेतली आणि पुन्हा स्मृतीला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर दीप्ती आणि स्मृतीमध्ये तू तू मै मै पाहायला मिळाली. दीप्ती गोलंदाजी आली पण एक्शन करून चेंडू टाकलाच नाही. त्याला स्मृतीनेही जशास तसं उत्तर दिलं. परत चेंडू टाकायला आली तेव्हा बाजूला झाली. हा प्रसंग पाहून बंगळुरुच्या डगआऊटमध्ये हास्यकल्लोळ झाला.
Kalesh spotted 👀#TATAWPL | #UPWvRCB | #WPL2024 pic.twitter.com/FTZ6cniwpt
— IPL Scoop (@Ipl_scoop) March 4, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी