मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी टॉप 3 मध्ये एन्ट्री मारली आहे. पण तिसऱ्या संघासाठी युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. या दोन्ही संघांचा स्पर्धेतील शेवटचा सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे यापैकी कोण टॉप ३ मध्ये एन्ट्री मारतो यांची उत्सुकता आहे. गुजराज जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात आज सामना होत आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना गुजरातने जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास सोपा होईल. नाही तर कठीण आव्हानाला सामोरं जावं लागू शकतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरुने 7 सामन्यात 3 विजय आणि 4 पराभवांसह एकूण 6 गुण मिळवले आहेत. अशीच यूपी वॉरियर्सचेही असून 6 गुण आहेत. पण या गणितात गुजरातला संधी चालून आली आहे. कारण स्पर्धेत त्यांचे दोन सामने बाकी आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु +0.027 च्या निव्वळ धावगतीमुळे तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या यूपी वॉरियर्सचा धावगती -0.365 आहे. दोन्ही संघांचा येथे आणखी एक सामना आहे आणि त्यावर त्यांचं पुढचं गणित अवलंबून आहे.