WPL 2024 | डब्ल्यूपीएल दुसऱ्या सत्राला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात, पहिला सामना कुठे?

| Updated on: Feb 22, 2024 | 8:42 PM

Womens Premier League 2024 | क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2024 आधी डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. वूमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या सत्राला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

WPL 2024 | डब्ल्यूपीएल दुसऱ्या सत्राला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात, पहिला सामना कुठे?
Follow us on

मुंबई | शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून वूमन्स प्रीमिअर लीग अर्थात डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या पर्वाच्या थराराला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे नवी दिल्ली आणि बंगळुरुत पार पडणार आहेत. एकूण 24 दिवस या दुसऱ्या हंगामाचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत एकूण 5 संघात एका ट्रॉफासाठी 2 स्टेडियममध्ये 20 सामने पार पडणार आहेत. तर त्यानंतर एलिमिनेटर आणि अंतिम सामना पार पडेल. या डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामाबाबत आपण जाणून घेऊयात.

एकूण 5 संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 8 सामने खेळणार आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हे सर्व सामने पार पडतील. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिट्ल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, यूपी वॉरियर्सज आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने असणार आहेत.

5 टीम 5 कॅप्टन

हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. मेग लँनिंग हिच्याकडे दिल्ली कॅपिट्ल्सची धुरा असणार आहे. सांगलीकर स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जबाबदारी सांभाळणार आहे. एलिसा हिली यूपी वॉरियर्सची कॅप्टन आहे. तर बूथ मूनी गुजरात जायंट्सचं कर्णधारपद भूषवणार आहे.

साखळी फेरी आणि प्लेऑफ

साखळी फेरीतील सामने हे 23 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान पार पडतील. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने भिडतील. तर साखळी फेरीची सांगता ही 20 मार्च रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्या सामन्याने होईल.

23 फेब्रुवारीपासून वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेला सुरुवात

सामने कुठे पाहता येणार?

वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तसेच सामने मोबाईलवर पाहण्यासाठी जिओ सिनेमा एपवर जावं लागेल.

पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध दिल्ली आमनेसामने

दरम्यान या दुसऱ्या मोसमातील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.