वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसऱ्यांदा एन्ट्री मारली आहे. मागच्या दोन पर्वात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्स, तर दुसऱ्या पर्वार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभवाची धूळ चारली होती. असं असताना तिसऱ्या पर्वात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मेग लेनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तिने पुन्हा एकदा सर्वोत्तम कर्णधार असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. तसं पाहिलं तर यंदाच्या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्सपेक्षा वरचढ दिसत आहे. कारण त्यांची सर्वात जमेची बाजू ही गोलंदाजी आहे. फिरकीपटू जेस जोनासेन आणि भारतील वेगवान गोलंदाज शिखा पांडे यांनी या स्पर्धेत प्रत्येकी 11 विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात मुंबई आणि दिल्ली आमनेसामने आले होते तेव्हा मुंबई इंडियन्सला 123 धावांवर रोखण्यात यश आलं होतं. तेव्हा शिखा आणि जोनासेनने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या होत्या. तर दिल्लीने हा सामना 9 विकेट राखून जिंकला होता. दिल्लीसाठी शफाली वर्माचा पॉवरप्ले आक्रमक खेळणं ही जमेची बाजू आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. लॅनिंगने 263 धावांसह योगदान दिले आहे.
दुसरीकडे, स्कायव्हर ब्रंटही चांगल्या फॉर्मात आहे. तिने मागच्या नऊ पैकी 5 सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. इतकंच काय तर गोलंदाजीतही योगदान देत आहे. मॅथ्यूजचे ऑफ-ब्रेक, तर अमेलिया केरचे लेग-ब्रेक प्रभावी ठरले आहेत. दिल्लीला जेमिमा रॉड्रिग्ज आणि मॅरिझेन कॅप यांच्याकडे खराब कामगिरी करणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ऑफ-स्पिनर संस्कृती गुप्ता चांगली कामगिरी करत आहे.त्यामुळे अंतिम फेरीत मुंबईची भक्कम फलंदाजी आणि दिल्लीची प्रभावी गोलंदाजी अशी लढत होईल.
मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), अक्षिता माहेश्वरी, अमनदीप कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हेली मॅथ्यूज, जिंतीमनी कलिता, कीर्थना बालकृष्णन, नादिन डी क्लर्क, नताली स्किव्हर-ब्रंट, पारुनिका सिसोनारी, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता, जी कमालिनी (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सायका इशाक आणि शबनीम इस्माईल.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लेनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्नेह दीप्ती, ॲलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, जेस जोनासेन, मारिझान कॅप, मिन्नू मणी, एन चरणी, निकी प्रसाद, राधा यादव, शिखा पांडे, नंदिनी कश्यप (विकेटकीपर), तानिया भाटिया (विकेटकीपर), सारा ब्रायस (विकेटकीपर) आणि तीतस साधू.