WPL 2024, MI vs DC : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयी सलामी, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय

| Updated on: Feb 23, 2024 | 11:35 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने 172 धावांचा पाठलाग करण्याचा शर्थीचे प्रयत्न केले. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला. 1 चेंडू 5 धावा आवश्यक असताना उत्तुंग षटकार ठोकला.

WPL 2024, MI vs DC : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयी सलामी, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्स विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेट्सने पराभूत केलं. या पराभवामुळे एलिस कॅप्सेची 75 धावांची खेळी खेळी वाया गेली. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या खात्यात दोन गुणांची कमाई झाली आहे. तसेच गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ टॉपला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची घसरण शेवटच्या स्थानावर झाली. मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली होती. हिली मॅथ्यूज शू्न्यावर बाद झाल्याने पहिल्या षटकापासून दडपण आलं होतं. त्यानंतर यास्तिका भाटिया आणि नॅट सायवर ब्रंट यांनी डाव सावरला. दोघांनी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यास्तिकाला हरमनप्रीत कौरची साथा लाभली. दोघांनी 56 धावांची भागीदारी केली. तसेच यास्तिकाने 45 चेंडूत 57 धावा केल्या. मात्र अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना बाद झाली.

कर्णधार हरमनप्रीत कौर हीने चेंडू आणि धावा यातील फरक कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 34 चेंडूत 55 धावांची खेळी केली. यात 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. दोन चेंडूत 5 धावांची गरज असताना षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण एलिस कॅप्सेच्या गोलंदाजीवर सुथरलँडने तिचा सीमेवर झेल घेतला. त्यामुळे एक चेंडू आणि पाच धावा अशी स्थिती आहे. त्यामुळे सामना पूर्णपणे दिल्लीच्या पारड्यात झुकला होता. सजना समोर होती आणि कॅप्से गोलंदाजी टाकत होती.

सजनाने कॅप्सेच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला आणि चेंडू थेट सीमेपार पोहोचवला. उपस्थितांना असं काही होईल याचा विश्वासच नव्हता. पण मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला होता. दिल्लीच्या खेळाडूंना डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.