नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या एलिमिनिटेर सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर 72 धावांनी मात केली आहे. मुंबईने यूपीला विजायासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इस्सी वाँग हीने घेतलेल्या हॅटट्रिकमुळे आण इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीमुळे मुंबईने यूपीवर विजय साकारला. मुंबईच्या गोलंदाजांनी यूपीचा बाजार 17.4 ओव्हरमध्येच 110 धावांवर उठवला अर्थात ऑलआऊट केलं. यूपीकडून मराठमोळ्या किरण नवगिरे हीने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर ग्रेस हॅरीसने 14 धावांचं योगदान दिलं.
दीप्ती शर्मा 16 रन्स करुन तंबूत परतली. कॅप्टन एलिसा हिली 11 धावांवर आऊट झाली. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तसेच पार्श्वी चोपरा ही शून्यावर नाबाद राहिली. तसेच मुंबईकडून इस्सी वाँग हीने हॅटट्रिकसह सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.साईका इशाक हीने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नॅट, हॅली आणि जिंतामनी या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
मुंबईचा शानदार विजय
???? ??? ?????! ??
Mark your calendars folks ?️@mipaltan will face the @DelhiCapitals in the summit clash of the #TATAWPL ? pic.twitter.com/gxsXQQ6Ihf
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 24, 2023
त्याआधी यूपीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 182 रन्स केल्या. मुंबईकडून नॅट सायव्हर-ब्रंट हीने सर्वाधिक 72 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. नॅट सायव्हर-ब्रंट व्यतिरिक्त मुंबईच्या इतर फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयश आलं.
मुंबईकडून सलामीवीर यास्तिका भाटिया हीने 21 धावांचं योगदान दिलं. हॅली मॅथ्यूज हीने 26 रन्स केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर 14 रन्स करुन माघारी परतली. मेली केर हीने 29 रन्स केल्या तर पूजा वस्त्राकर 11 धावांवर नाबाद राहिली. यूपीकडून सोफी एक्लेस्टोन हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अंजली सर्वनी आणि पार्श्वी चोपरा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
साखळी फेरीत धावांच्या सरासरीने दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली. तर मुंबईने एलिमिनेटर फेरीत युपीला पराभवाची धूळ चारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात 26 मार्चला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.
यूपी वॉरियर्स | अलिसा हिली (विकेटकीपर आणि कॅप्टन), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्श्वी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड.