मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरी रोमांचक मोडवर पोहोचली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात जेतेपदासाठी लढत सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी खरा ठरवला होता. पॉवर प्लेमध्ये शफाली वर्माचं वादळ अनुभवायला मिळालं. शफाली वर्माने 26 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. तर मेग लॅनिंग 16 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे गोलंदाज हतबल झाले होते. 7 षटकात नाबाद 64 धावा झाल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावर दडपण स्पष्ट दिसत होतं. असं सर्व चित्र असताना कर्णधार स्मृती मंधाना हीने संघाचं आठवं षटक मोलिनेक्सला चेंडू सोपवला. मोलिनेक्सने स्मृतीचा हा निर्णय खरा ठरवा. एकाच षटकात तीन गडी बाद करत दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर ढकललं.
मोलिनेक्सच्या पहिल्याच चेंडूवर शफाली वर्माने उत्तुंग शॉट्स मारला. सीमेवर उभ्या असलेल्या वारेहमने तिचा सहज झेल घेतला आणि पहिला ब्रेक मिळाला. शफाली वर्मा 27 चेंडूत 44 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स मैदानात उतरली आणि पहिला चेंडू निर्धाव गेला. मोलिनेक्सच्या तिसऱ्या चेंडूवर जेमिमाहचा त्रिफळा उडला आणि तिला खातंही खोलता आलं नाही. चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी एलिस कॅप्से मैदानात उतरली. पण तिलाही मोलिनेक्सने टाकलेला चेंडू कळाला नाही आणि त्रिफळा उडाला. दिल्लीच्या 64 धावांवर एकही विकेट नव्हती. पण पुढच्या चार चेंडूत 64 धावांवर 3 गडी तंबूत परतले होते.
Not going good and Moli knew
Not one, not two, she gave us a triple breakthrough ♨️#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2024 #WPLFinal #DCvRCB pic.twitter.com/tGVYePU2tc— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 17, 2024
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.